शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’साठी विद्यार्थ्यांची धडपड

By admin | Updated: August 6, 2015 03:01 IST

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केल्याने पालकांची चांगलीची

अलिबाग : शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे केल्याने पालकांची चांगलीची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यात २६ लाख ३४ हजार २०० लोकसंख्येपैकी २२ लाख ४३ हजार ८७२ नागरिकांनी आधारची नोंदणी केली आहे. उर्वरित आकडेवारीमध्ये जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची नोंदणी करणे अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात ८५.१८ टक्के आधार नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे.आधार नोंदणी करण्यासाठी ८२ किट्स देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक रोहे तालुक्यात १५, तर अलिबाग तालुक्यात १३ किट्स वितरीत केल्या आहेत. आधार नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज आहे. ते उपलब्ध नसल्याने ३८ किट्स बंद ठेवाव्या लागल्या आहेत. आॅपरेटिंगचे काम येते त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.विद्यार्थ्यांची आधार नोंदणी होणे बाकी आहे. त्या दिशेने प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात दोन हजार ६७९ अंगणवाडी केंद्रे, ५२० मिनी केंद्रे अशी एकूण तीन हजार १९९ केंद्रे आहेत. ० ते ५ वर्षेमधील अंगणवाडी लाभार्थ्यांची संख्या एक लाख ७५ हजार ९२८ आहे. एक हजार १२० अंगणवाडीतील ४१ हजार ४५ लाभार्थ्यांची आधार नोंदणी केली आहे, तर एक लाख ३४ हजार ८८३ लाभार्थ्यांची नोंदणी बाकी आहे.एक लाख ६३ हजार १७७ विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी नाही.