शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आग प्रतिबंधक उपाययोजनांना हरताळ

By admin | Updated: April 24, 2017 02:31 IST

खारघरमधील आदित्य प्लॅनेट या बारा मजली इमारतीच्या तळमजल्यावरील शोरूमला लागलेल्या आगीत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

वैभव गायकर / पनवेलखारघरमधील आदित्य प्लॅनेट या बारा मजली इमारतीच्या तळमजल्यावरील शोरूमला लागलेल्या आगीत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यात शोरूमचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे या इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणा बंद असल्याचे उघडकीस आले आहे. केवळ या दुर्घटनाग्रस्तच नव्हे, तर पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील बहुतांशी उंच इमारतीत आग प्रतिबंधक नियमांना हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. सहा महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेत सिडको नोडसह तळोजा एमआयडीसीचा समावेश आहे. सिडको नोडमध्ये बहुमजली इमारती उभारल्या आहेत. नियमानुसार प्रत्येक इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे असते. मात्र अनेक इमारतीत या नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. खारघर-कोपरा सेक्टर १0 येथील आदित्य प्लॅनेट या बारा मजली निवासी इमारतीच्या तळमजल्यावर गाड्यांचे मोठे शोरूम आहे. या शोरूमला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत दोन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर विक्रीसाठी ठेवलेल्या दहापेक्षा अधिक नवीन गाड्या भस्मसात झाल्या. आग विझविण्यासाठी तब्बल चार तासांचे शर्थीचे प्रयत्न करावे लागले. इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा आहे. परंतु ती कार्यरत नसल्याने आग विझविण्यासाठी अग्निशम दलाची प्रतीक्षा करावी लागली. या इमारतीत ६0 ते ७0 कुटुंब राहतात. आग वेळीच नियंत्रणात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. याची गंभीर दखल घेत संबंधित विभागाने या सोसायटीला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सिडको नोडसह महापालिका क्षेत्रातील बहुमजली इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणांची झाडाझडती घेण्याचा निर्णय अग्निशमन विभागाने घेतला आहे. तसेच आदित्य प्लॅनेट सोसायटीतील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील विविध शोरूम्सना नोटिसा बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.