शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

हुमगाव ग्रामपंचायतीला ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’

By admin | Updated: May 11, 2017 02:06 IST

कर्जत तालुक्यातील हुमगाव ग्रामपंचायतीचा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. त्यांना पालक मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील हुमगाव ग्रामपंचायतीचा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. त्यांना पालक मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले असून दहा लाख रु पयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. हुमगाव ग्रामपंचायतीला हा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाल्याने कौतुक केले जात आहे. राज्यातील गावांचा विकास घडवून आणण्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने राज्यात सन २०१०-११ पासून पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत उद्दिष्ट साध्य केलेल्या ग्रामपंचायतींना निधीच्या स्वरूपात पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार कर्जत तालुक्यातून हुमगाव ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. हुमगाव ग्रामपंचायतीने पर्यावरणाचा समतोल राखणे, व त्यातून समृद्ध ग्राम निर्माण करणे, चांगल्या प्रकारे विकासकामे यात गुण प्राप्त केल्याने या ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी निवड झाली होती. हुमगाव ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाला, प्रमाणपत्र देऊन १0 लाख रु पयांचा निधी जाहीर करण्यात आला असल्याचे ग्रामसेवक अनुजा एनकर यांनी सांगितले.