शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

संभाजी देशमुख यांची समाधी होणार संरक्षित स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 05:01 IST

सुधागड मराठ्यांच्या ताब्यात घेण्याचा पराक्रम : जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरातत्व विभागाने सविस्तर माहिती मागविली

जयंत धुळप 

अलिबाग : संभाजी राजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांच्या काळात, रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ल्यावरील मोगलांचे साम्राज्य गनिमीकाव्याने उलथवून टाकून, सुधागड मराठ्यांच्या ताब्यात घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पराक्र मी संभाजी हैबतराव देशमुख यांची सुधागड तालुक्यातील तिवरे गावातील समाधी, राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याकरिता आवश्यक प्रस्ताव सादर करण्याकरिता विविध नऊ मुद्द्यांवर राज्याच्या पुरातत्व विभागाचे रत्नागिरी येथील सहायक संचालक भा. वि. कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून माहिती मागविली आहे.समाधीच्या अस्तित्वाबाबत ७८ ऐतिहासिक दस्तपुरावे सुधागड तालुक्यातील तिवरे गावांत आडबाजूला अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असलेली पराक्रमी संभाजी देशमुख यांची ही समाधी तब्बल तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ऐतिहासिक दस्तावेज व ग्रंथाच्या अभ्यासांती शोधून काढण्यात इतिहास संशोधक परब यांना यश आले. समाधीबाबत अधिकृत पुरावे त्यांनी सादर करून ती समाधी पराक्र मी संभाजी हैबतराव देशमुख यांची असल्याचे सिद्ध केले.च्महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाने इतिहास संशोधक परब यांचे संशोधनास प्रसिद्ध केले होते.पहिला उल्लेख भोर संस्थानच्या इतिहासातच्संभाजी हैबतराव देशमुख यांनी किल्ले सुधागड हस्तगत करण्यासाठी केलेल्या पराक्र मां संदर्भातील पहिला उल्लेख अनंत नारायण भागवत यांनी लिहिलेल्या ‘भोर संस्थानचा इतिहास’ या ग्रंथात आढळतो. त्यामध्ये, ‘सुधागड किल्ला चढून एकदम हल्ला करण्यास मार्ग नाही, असे पाहून त्यांच्या धारकºयांनी तो युक्तीनेच छापा घालून घेण्याची खटपट केली आणि ती शेवटासही गेली. तेव्हा संभाजी हैबतराव, राघोजी गौळी, रत्नोजी हुले, हिरोजी जाधव, जावजी चव्हाण, गंगाजी शिंदे वगैरे मुख्य धारकरी असून, त्या सर्वांचा आणि सरदार मालोजी भोसले यांचा समावेश होता,’ अशी नोंद आहे.च्पराक्र मी संभाजी देशमुख यांची तिवरे गावातील समाधी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित होणार असल्याची माहिती अथक परिश्रमांती ही समाधी शोधून काढणारे परळी (पाली) येथील इतिहास अभ्यासक व संशोधक संदीप मु. परब यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.पंतसचिव शंकराजी नारायण यांचे इनामपत्रच्या कालखंडासंदर्भात ग्रंथकार अनंत भागवत यांनी कोणत्याही तारखेचा उल्लेख केलेला नसला, तरी तो सुधागड या किल्ल्याशी निगडित आहे. मात्र, संभाजी देशमुख यांना मिळालेल्या इनामपत्राच्या संदर्भातील नोंदीत उल्लेख आहे.संभाजी देशमुख समाधीच्सुधागड तालुक्यात मौजे तिवरे, येथे सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांची समाधी आहे. समाधीची एक बाजू मोडकळीस आली असून, समाधीचा इतर भाग सुस्थितीत आहे. समाधीच्या चारही बाजूस दहा इंचात कोरीव नक्षीकाम केलेले आहे. समाधीच्या मुख्य चौथºयाच्या मध्यभागी चौकोनात समाधी लेख कोरलेला आहे. या लेखात,‘संभाजीराव निरंतर बहिरजीराव शके. १७.२२’ असे नमूद करण्यात आले आहे.समाधी लेखाची चिकित्साच्डॉ. मो. गं. दीक्षित यांनी ‘मराठेशाहीतील शिलालेख’ या आपल्या ग्रंथात महाराष्ट्रातील शके १४९७ पासून शके १८०० पर्यंतचे सुमारे १५२ शिलालेख संग्रहित करून, ते लेख कोरण्याकरिता वापरण्यात येणारा दगड, लेखाची जागा, लेख कोरण्याची पद्धत, लेखाची भाषा व लिपी, लेखाचे लिखाण, लेखाचा मायना, लेखाचा कालखंड व व्यक्तिनाम या विविध अंगाने विस्तृत असे विवेचन केलेले आहे. सरदार संभाजी हैबतराव यांच्या समाधीवरील लेखाचे निरीक्षण केले असता, ही समाधी संभाजी हैबतराव देशमुख यांचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Raigadरायगड