शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहतुकीमुळे खचतेय वेळास-फर्शी येथील रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2015 23:31 IST

दिघी पोर्टवर जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांचे भविष्य अवलंबून आहे. दळणवळणासाठी आवश्यक असणारे रस्ते नेहमीच अपघाताचे कारण ठरले आहे.

बोर्ली-पंचतन : दिघी पोर्टवर जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांचे भविष्य अवलंबून आहे. दळणवळणासाठी आवश्यक असणारे रस्ते नेहमीच अपघाताचे कारण ठरले आहे. दिघी पोर्टवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वेळास-फर्शी येथील सात नाल्यांची मोरी खचत आहे. याबाबत सोमवारी उपविभाग अधिकारी (प्रांत) तहसीलदार व दिघी सागरी पोलीस ठाणे यांना येथील नागरिक सचिन दळवी यांनी लेखी निवेदन दिले आहे.दिघी ते माणगाव रस्त्यावर या अगोदर अनेक अपघात झाले आहेत, ते दिघी पोर्टवरील अवजड वाहनांमुळेच. म्हसळा घोणसे घाट, मोर्बे घाटात अनेक वेळा अपघात होवून कित्येकांचे बळी गेले आहेत. वेळास येथील सात नाल्यांची मोरी खचत आहे. दिघी पोर्ट लिमिटेडमधून पॉस्को कंपनीच्या कॉईल्स, कोळसा, बॉक्साईडची निर्यात होत असते व पोर्टच्या बांधकामांसाठी अवजड लोखंडी पट्ट्या, प्लेट, खडी, रेती, डबर क्रशसॅन्ड यांची वाहतूक चालू आहे. दिघीपोर्टच्या या वाढत्या अवजड वाहतुकीने हा रस्ता व मोरी खचण्याच्या मार्गावर आहे. रस्ता खचला तर जिल्ह्याचे महत्त्वाचे कार्यालयीन कामाचे ठिकाण असलेल्या अलिबाग येथे जाणे व या रस्त्यावरून दिघी कुडगाव, हरवित, आदगांव, सर्वे रोहिणी, तुरूंवाडी, सावर्डे आदिवासीवाडी लोकांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)पोर्टचे दुर्लक्षवेळास फर्शीपासून दिघीकडे जाणाऱ्या १६० मीटरच्या रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्यावरून आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांना उपचारासाठी बोर्ली पंचतन, श्रीवर्धन येथे दवाखान्यात न्यावे लागत असल्याने हाल होतात. याबाबतीत तक्रार करूनही पोर्टच्या व्यवस्थापकांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.