शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पेण अर्बनच्या छोट्या खातेदारांना दिलासा

By admin | Updated: August 27, 2015 00:51 IST

बुडीत निघालेल्या पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना गणेशोत्सवापूर्वी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे १ ते १० हजार रुपये अशी रक्कम असलेल्या तब्बल १ लाख ३४ हजार ६५७

अलिबाग : बुडीत निघालेल्या पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना गणेशोत्सवापूर्वी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे १ ते १० हजार रुपये अशी रक्कम असलेल्या तब्बल १ लाख ३४ हजार ६५७ छोट्या खातेदारांना त्यांची रक्कम परत मिळणार आहे.उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर चार आठवड्यांच्या आत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती दि पेण को-आॅपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड प्रशासक मंडळ अध्यक्ष शरद जरे यांनी दिली आहे. रक्कम खातेदारांना बँकेच्या ठिकठिकाणच्या संबंधित शाखेमध्येच स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेकद्वारे मिळणार असल्याची माहिती पेण अर्बन बँक प्रशासक मंडळातील ठेवीदार प्रतिनिधी तसेच ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. ठेवीदारांचे हित विचारात घेवून,बँकेचे बँकिंग लायसन्स रिझर्व्ह बँकेने रद्द केले असतानाही दहा हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीदार व खातेदारांना त्यांची १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम परत देण्याचा हा देशातील पहिलाच निकाल असल्याचे जाधव यांनी सांगितले. १ लाख ३४ हजार ६५७ खातेदारांचे पैसे चालू खाते, बचतखाते, मुदत ठेवी, दैनिक खाते, आवर्ती खाते यामध्ये आहेत. एकाच खातेदाराची या सर्व खात्यांमध्ये असणारी रक्कम १० हजार रुपयांपेक्षा अधिक होत असल्यास, त्या खातेदारास मात्र या निर्णयाचा लाभ मिळू शकणार नाही. एक वा एकापेक्षा अधिक खात्यांतील एकूण रक्कम ही दहा हजार रुपयांच्या आत असणाऱ्या खातेदारांनाच याचा लाभ मिळणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)विशेष व्यवस्था : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशापासून चार आठवड्यांत पैसे परत करण्याची कार्यवाही पूर्ण करावयाची असल्याने सर्व ठेवीदार व खातेदार यांच्या शंका व समस्या यांचे निरसन करण्याकरिता बँकेने संपर्कअधिकारी यांची मुख्य कार्यालय व शाखा स्तरावर नेमणूक केली आहे. यामध्ये अनिता मेश्राम, आरती सत्वे (मुख्य कार्यालय-पेण, शाखा कार्यक्षेत्र-पेण, रामवाडी, चिंचपाडा, वडखळ, पोयनाड ,संपर्क क्र मांक ०२१४३-२५३३१५), श्रेया साटम (शाखा कार्यक्षेत्र-गिरगांव, दादर, विलेपार्ले, उरण. संपर्क क्र मांक-०२२-२४३६२५०७), स्नेहा साळुंखे व भाग्यश्री नाईक (शाखा कार्यक्षेत्र- कर्जत, नेरळ, माथेरान, संपर्क क्र मांक-०२१४८-२२२२०३,२३८९१८),पूजा जोगळेकर व अक्षया लाड(शाखा कार्यक्षेत्र-खोपोली, शिळफाटा, वावोशी, मोहोपाडा. संपर्क क्र मांक ०२१९२-२६६२९४,२६३४४४), सोमनाथ अहिरे (शाखा कार्यक्षेत्र- रोहा, पाली, कोलाड. संपर्क क्र मांक ०२१९४-२३३९९१)यांचा समावेश आहे.