शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला २६ कोटींची वसुली ?

By admin | Updated: May 9, 2017 01:25 IST

शहरात सुरू असलेल्या डंपरमधील ओव्हरलोड वाहतुकीमागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे.

कमलाकर कांबळे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात सुरू असलेल्या डंपरमधील ओव्हरलोड वाहतुकीमागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करण्यासाठी प्रत्येक डंपरमागे महिन्याला हप्ता वसूल केला जातो. वसुलीची ही रक्कम प्रति महिना जवळपास २६ कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. याप्रकाराला संबंधित आरटीओ कार्यालयांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.मुंबईच्या विविध उपनगरांत सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी खडी, रेती आणि क्रॅश सॅण्ड रायगड जिल्ह्यातील उरण व पनवेल परिसरातून पुरविली जाते. हे साहित्य पुरविण्यासाठी दीड हजारापेक्षा अधिक डंपर दिवस-रात्र मुंबईत फेऱ्या मारतात. विशेष म्हणजे यातील बहुतांशी डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरलेला असतो. या प्रकाराला संबंधित आरटीओचे अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. नाव न छापण्याच्या अटीवर वाहतूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार ओव्हरलोड वाहतुकीसाठी प्रत्येक डंपरमागे महिन्याला १७,५00 रुपयांचा हप्ता घेतला जातो. एकूण डंपरच्या प्रमाणात हप्त्याचा हा आकडा प्रति महिना २६ कोटींच्या घरात असल्याची खळबळजनक माहिती सूत्राने दिली. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करण्यास अनेक डंपर चालकांचा विरोध आहे. ओव्हरलोड वाहतूक केल्याने डंपरचे नुकसान होते. टायर फुटून अपघात होण्याची शक्यता असते. तसेच अवैध वाहतूक करताना अपघात झाल्यास इन्शुरन्सही मिळत नाही. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होते. उड्डाणपुलाला तडे जातात. या सर्व पार्श्वभूमीवर क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतुकीला प्रतिबंध घालावा, अशी मागणी वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकरच परिवहन आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतल्याचे समजते. महेश झगडे हे परिवहन आयुक्त असताना त्यांनी राज्यातील आरटीओ कार्यालये दलालमुक्त केले होते. तसेच कठोर निर्णय घेवून ओव्हरलोड वाहतुकीला आळा घातला होता. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित आरटीओला दिले होते. त्यामुळे काही काळातच या गैरप्रकाराला आळा बसला होता. परंतु परिवहन आयुक्तपदावरून त्यांची बदली होताच परिवहन (आरटीओ) कार्यालयांना पुन्हा दलालांचा विळखा पडला आहे. राजरोसपणे ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. नवी मुंबईत तर अवैध माल वाहतुकीने कळस गाठला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मधून सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. परंतु त्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने आरटीओच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.