शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कांदळवनांच्या क्षेत्राचे वास्तव : १५ गावांतील शेतकरी, मच्छीमारांची होणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:04 IST

रायगड जिल्ह्यातील कांदळवनांच्या क्षेत्राचे वास्तव ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर गावागावातील शेतकरी, मच्छीमार विशेष करून नारी शक्ती जागी झाली आहे.

- आविष्कार देसाई ।अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कांदळवनांच्या क्षेत्राचे वास्तव ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर गावागावातील शेतकरी, मच्छीमार विशेष करून नारी शक्ती जागी झाली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सरकारने आणलेल्या ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ यशस्वीपणे राबविण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. जिल्हाधिकाºयांनी या योजनेचे प्रेझेंटशन द्यावे, अशी मागणी करण्यासाठी जिल्हाधिकाºयांची मंगळवारी भेट घेण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच परिसरातील १५ गावातील शेतकरी, मच्छीमार, कष्टकरी यांची रविवारी बैठक बोलावण्यात आल्याचीमाहिती श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी दिली.सरकारची योजना पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबरच शेतकरी, मच्छीमार, कष्टकरी यांचा आर्थिक स्तर उंचावणारी आहे. योजनेचा लाभ खºया लाभार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी मुळात त्यांना योजनेची माहिती असणे गरजेचे असते. तेव्हाच ती यशस्वीपणे राबवता येते. ‘लोकमत’ने या योजनेची माहिती २७ सप्टेंबरच्या अंकात प्रसिध्द केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. नंदन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, किती सरकारी जमिनीवर कांदळवने आहेत याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे, मात्र खासगी जमिनींचे सर्व्हेक्षणच झालेले नसल्याने त्याचा आकडा प्रशासनाकडे नाही हे देखील उघड झाले आहे असेही, त्यांनी स्पष्ट केले.सरकारी योजनेचा गावागावांमध्ये फायदा झाला पाहिजे यासाठी २८ सप्टेंबर रोजी श्रमिक मुक्ती दलाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. जिल्हाधिकाºयांनी या योजनेचे प्रेझेंटेशन दिल्यास योजना नेमकी काय आहे, सरकारचे धोरण आणि प्रशासन ते कसे राबवणार याची किमान माहिती शेतकºयांसह मच्छीमारांना होईल, या निर्णयावर बैठकीत एकमत झाल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ गावातील प्रत्येक ग्रामस्थांना कळावी यासाठी १ आॅगस्ट रोजी शहापूर येथे १५ गावातील ग्रामस्थांची बैठक बोलावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.खारबंदिस्तीकडे दुर्लक्ष केल्याने हजारो हेक्टर जमीन नापीकखारभूमी विभागासह स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनाने खारबंदिस्तीकडे दुर्लक्ष केल्याने हजारो हेक्टर नापीक झाल्याचे जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. त्याचप्रमाणे खासगी जमिनींचे सर्व्हेक्षण झाले नसल्याने कोणाची कोणती जागा आहे, कोणत्या जागेत किती कांदळवन आहे हे सांगण्यासाठी खासगी मालकांच्या जागेमध्ये सीमांकन झालेले नाही. त्यामुळे अनिश्चितता आहे. खासगी जमिनींचे तातडीने सर्व्हेक्षण केल्यास योजनेतील अडसर दूर करता येईल, असेही राजन भगत यांनी सांगितले.