Video : रणवीर-दिपिका अलिबागच्या रजिस्टार ऑफिसला, 22 गुंठे जागेची खरेदी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 12:38 IST2021-09-13T12:32:25+5:302021-09-13T12:38:55+5:30
रणबीर सिंह आणि दिपिका यांना पाहून अलिबागमध्ये चाहते त्यांच्या मागे धावताना दिसून आले.

Video : रणवीर-दिपिका अलिबागच्या रजिस्टार ऑफिसला, 22 गुंठे जागेची खरेदी!
रायगड : अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील जमीन व्यवहार प्रकरणी बॉलिवूडचा एनर्जी बॉय रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दिपीका पदुकोण हे अलिबाग येथे आले आहेत. अलिबाग रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आज दुपारी 12 वाजता पोहोचले असून त्यांनी 22 गुंठे जागा संबंधित परिसरात खरेदी केल्याचे समजते.
रणवीर सिंग आणि दिपिका यांना पाहून अलिबागमध्ये चाहते त्यांच्या मागे धावताना दिसून आले. मात्र, रणवीरने आपला चेहरा पूर्णपणे झाकला असून दिपिकानेही मास्क परिधान केला आहे. दोघांनीही रजीस्ट्रेशन ऑफिसला भेट दिली असून मापगाव येथे 22 गुंठे जमीन खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत, अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही. मात्र, जमिनीच्या व्यवहारासंदर्भात त्यांची अलिबाग भेट आहे, अशी येथील सुत्रांची माहिती आहे. या दोघांचा अलिबाग रजिस्टार कार्यालयातून बाहेर पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रणवीर अन् दिपिका अलिबागच्या रजिस्टार ऑफिसला, 22 गुंठे जागेची खरेदी pic.twitter.com/8WNxk9TjIO
— Lokmat (@MiLOKMAT) September 13, 2021