Raigad: अलिबागचा पांढरा कांदा आला बाजारात, यंदा उत्पादन वाढले, व्यापाऱ्यांच्या खरेदीकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे 

By राजेश भोस्तेकर | Published: February 5, 2024 12:11 PM2024-02-05T12:11:22+5:302024-02-05T12:12:02+5:30

Raigad white onion: अलिबागचा औषधी आणि गुणकारी असलेला पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. अलिबाग वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीस दुकाने सजली आहेत. दीडशे ते अडीचशे रुपये कांदा माळ विक्री केली जात आहे. अलिबागमध्ये आलेले पर्यटक हे आवर्जून कांदा खरेदी करीत आहे.

Raigad: Alibaug's white onion has hit the market, production has increased this year, farmers are eyeing the purchase of traders | Raigad: अलिबागचा पांढरा कांदा आला बाजारात, यंदा उत्पादन वाढले, व्यापाऱ्यांच्या खरेदीकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे 

Raigad: अलिबागचा पांढरा कांदा आला बाजारात, यंदा उत्पादन वाढले, व्यापाऱ्यांच्या खरेदीकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे 

- राजेश भोस्तेकर 
अलिबाग - अलिबागचा औषधी आणि गुणकारी असलेला पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. अलिबाग वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीस दुकाने सजली आहेत. दीडशे ते अडीचशे रुपये कांदा माळ विक्री केली जात आहे. अलिबागमध्ये आलेले पर्यटक हे आवर्जून कांदा खरेदी करीत आहे. यंदा उत्पादन गतवर्षी पेक्षा अधिक झाल्याने व्यापारी वर्गाने सध्या पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना कांद्याचा भाव कमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लिबाग तालुक्यातील कार्ले, नेहुली, वेश्वी, वांडगाव, मुळे, धोलपाडा, खंडाळे, रुळे, तळवळी या गावात पांढरा कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अलिबाग मधील २५० हेक्टर वर कांदा लागवड केली जाते. यंदा अवेळी पाऊस पडल्याने कांदा पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र तशी वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. यावेळी तालुक्यात पांढरा कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात कांदा मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.

अलिबागचा कांदा खरेदीसाठी व्यापारी वर्ग हा काढणी आधी शेतकऱ्याकडे येत असतो. गतवर्षी मणाला १४०० रुपये दर व्यापारी यांच्याकडून देण्यात आला होता. यावेळी आठशे ते अकराशे दर दिला जात आहे. मात्र उत्पादन अधिक वाढले असल्याने व्यापारी वर्गाने सध्या पाठ फिरवली आहे. भाव कमी होईल या आशेने व्यापारी आलेले नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यापारी येण्याकडे डोळे लागले.

व्यापारी वर्ग अद्याप आले नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर आपले दुकान थाटले आहे. त्यामुळे अलिबाग वडखळ मार्गावर सध्या कांदा विक्रीस दिसू लागला आहे. छोट्या कांद्याची माळ दीडशे तर मोठी माळ अडीचशे रुपये दराने मिळत आहे. अलिबाग हे पर्यटन स्थळ असल्याने येणारे पर्यटक आवर्जून माघारी निघताना पांढरा कांदा खरेदी करीत आहेत. व्यापारी आले नसले तरी शेतकऱ्यांचा माल हा विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पांढरा कांद्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.

Web Title: Raigad: Alibaug's white onion has hit the market, production has increased this year, farmers are eyeing the purchase of traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.