शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

रोह्यात राष्ट्रवादी-शेकापला धक्का; सेना-भाजपची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 9:54 AM

वाशी ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर गटाने नऊ पैकी नऊ जागा जिंकल्या. रोठ बुद्रुकमध्ये भाजप युवक जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीवर बहुमत प्राप्त केले आहे.

रोहा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निकालात राष्ट्रवादी शेकापला पारंपरिक ग्रामपंचायतीमध्ये जोरदार धक्का बसला. राष्ट्रवादी पक्षाचे प्रबल्य असलेल्या रोठ बुद्रुकमध्ये सेना-भाजप युतीने मुसंडी मारली, तर बालेकिल्ला असलेल्या वाशी ग्रामपंचायतीमध्ये सुरेश मगर गटाने राष्ट्रवादीचा पाडाव करीत सर्वच्या सर्व नऊ जागांवर दणदणीत विजय मिळवून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला नो एंट्री केली आहे. या निकालात राष्ट्रवादीने १२ ग्रामपंचायतीवर सत्ता राखून तालुक्यावर वर्चस्व कायम ठेवले. सेना भाजपने तालुक्यात शेकाप राष्ट्रवादीला रोखून धरत सहा ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली.  शेका पक्षाकडे दोन, तर वाशी ग्रामपंचायत अपक्ष सुरेश मगर गटाकडे गेली आहे.वाशी ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर गटाने नऊ पैकी नऊ जागा जिंकल्या. रोठ बुद्रुकमध्ये भाजप युवक जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीवर बहुमत प्राप्त केले आहे. रोठ खुर्दमध्ये जनार्दन मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने दिनेश मोरेंचा पराभव करीत  येथे सत्ता स्थापन केली आहे. अलिबाग मतदारसंघातील शेणवई, शेडसई, वावे पोटगे ग्रामपंचायतीत शिवसेनेने दमदार मुसंडी मारत शेकापला विधानसभेनंतर दुसऱ्यांदा जोरदार दणका दिला. कोंडगाव, महाळुंगेवर शेकापने लाल बावटा फडकवला. सेना भाजपा युतीला शेणवई, शेडसई, वावेपोटगे, ऐनघर, निडीतर्फे अष्टमीत जोरदार एन्ट्री मिळाली आहे.  खांब, गोवे, चिंचवली तर्फे दिवाळी तिसे आपल्याकडे ठेवली.धामणसई, मालसईत राष्ट्रवादी सेना आघाडीत बिघाडी झाली. याचा फटका सेनेला बसला. दोन्ही ग्रा.पं.तीवर राष्ट्रवादीने दमदार वर्चस्व राखले. तळाघर, घोसाळे, वरसेत राष्ट्रवादीला विजय मिळाले. नागोठणेतील पळसमध्ये राष्ट्रवादीचे शिवराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व पुन्हा कायम राहिले. ऐनघर ग्रामपंचायतीत शिवसेनेला तब्बल १४ जागा मिळाल्याने सेना प्रबळ ठरली. संबंध तालुक्याचे लक्ष लागलेल्या वाशीत राष्ट्रवादीची प्रतिष्ठा धुळीला मिळाली, तर काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर हे मास लीडर ठरले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRaigadरायगडElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा