शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

नुकसानदायी खेकड्यांचे संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 11:59 PM

खारेपाटातील समुद्र संरक्षण बंधारे वारंवार फुटून खारे पाणी शेतात घुसून शेत जमीन नापीक होत आहे.

- जयंत धुळप अलिबाग : खारेपाटातील समुद्र संरक्षण बंधारे वारंवार फु टून खारे पाणी शेतात घुसून शेत जमीन नापीक होत आहे. मात्र, हे बंधारे फु टण्याचे कारण शोधले असता खारेपाटातील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांना खेकडे बिळे करतात. त्यात समुद्र-खाडीचे पाणी शिरते, सतत या बिळांमध्ये पाणी शिरून बंधारा कमकुवत होऊन मोठ्या उधाण भरतीच्या तडाख्याने फुटून भातशेतीचे नुकसान होते, अशी खारेपाटातील मूळ समस्या असल्याचे समोर आले आहे. मात्र, आता खारेपाटातील तरुण आणि पदवीधर शेतकºयांनी या परिस्थितीवर मात करण्याकरिता या नुकसान करणाºया खेकड्यांना आपल्या पिढीचे अर्थाजनांचे साधन बनविण्याचा निर्धार के ला आहे. खारेपाटात जिताडा माशांच्या संवर्धनाबरोबरच आता खेकडा संवर्धन आणि विक्री उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खेकडा संवर्धन प्रकल्पाची तयारी केलेले शहापूरमधील तरुण शेतकरी किरण यशवंत पाटील यांनी दिली आहे.खारेपाटातील धाकटे शहापूर, मोठे शहापूर आणि धेरंड या तीन गावांतील तरुण शेतकºयांच्या आदर्श मित्रमंडळाच्या सदस्य शेतकºयांनी श्रमिक मुक्ती दलाच्या सहयोगाने आपल्या तीन गावांतील खेकडा संवर्धन आणि विक्री व्यवसायाच्या संधींचा संपूर्ण अभ्यास केला. व्यवसायाच्या अनुषंगाने गावातील शेतकºयांच्या मानसिकतेचा अंदाज घेतला असता त्यांचा त्याकरिता सकारात्मक प्रतिसाद लाभला. खेकड्याला स्थानिक बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढत असलेल्या मागणीचा अभ्यास करून, येत्या काळात खेकडा शेती व्यवसायाला महाराष्ट्र किनारी मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.खेकडा शेती ही कोळंबी शेतीला पर्याय ठरू शकते, अशा निष्कर्षापर्यंत हे तरुण शेतकरी पोहोचले. सद्यस्थितीत मच्छीमार खाडीलगतच्या भागातून खेकडे पकडून नगण्य किमतीत विक्री करताना दिसून येतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीपेक्षा पूर्व किनारपट्टीवरील आंध्रप्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यांनी गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वीच खेकडा शेती हा व्यवसाय सुरू के ला आहे. याच धार्तीवर खेकडा संवर्धनावर भर देण्यात येत आहे.>मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षणाकरितातीन तरुण तामिळनाडूला रवानातामिळनाडूतील नागापट्टणम येथील केंद्र सरकारच्या ‘राजिव गांधी सेंटर फॉर अ‍ॅक्वाकल्चर’ या संस्थेत आयोजित ‘मॅन्ग्रु क्रॅब अ‍ॅक्वाकल्चर’ संदर्भातील मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षणाकरिता आदर्श मित्रमंडळाचे किरण यशवंत पाटील, किशोर पाटील, नंदकुमार धुमाळ हे तरुण शेतकरी तामिळनाडूला गेले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे. तामिळनाडू येथून आल्यानंतर हे तिघेही तरुण शेतकरी खारेपाटातील शेतकरी बांधवांना येथे प्रशिक्षण देतील आणि लवकरच खेकडा शेतीला प्रत्यक्ष प्रारंभ होईल, असे भगत यांनी स्पष्ट के ले.>महाराष्ट्रात उत्पादन कमीखेकडा उत्पादनात तामिळनाडू राज्याचा देशात प्रथम क्र मांक लागतो.गुजरात आणि केरळमध्ये देखील खेकडा शेती गतिमान झाली आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये हे उत्पादन अन्य माशांच्या तुलनेत केवळ २८ टक्के आहे.खेकडा शेती ही कोळंबी संवर्धनाप्रमाणे विकसित केल्यास तरुण नवउद्योजकांना खात्रीचे उत्पन्नाचे साधन मिळू शकते, असा अंतिम निष्कर्ष प्राप्त झाल्यावर खारेपाटातील तरुण शेतकºयांनी खेकडा शेतीकरिता तामिळनाडूमध्ये जाऊन शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.>खेकड्यांची नगण्य किमतीला विक्रीसद्यस्थितीत मच्छीमार खाडीलगतच्या भागातून खेकडे पकडून नगण्य किमतीत विक्री करतात. यामुळे त्यांना त्यांच्या उपजीवीके साठी त्याचा फारसा फायदा होत नाही. या सव बाबींचा विचार करून खेकडा संवर्धनावर भर देण्याचा विचार तरुण शेतकºयांचा आहे.