शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

७० हजार कोटींचे प्रकल्प कागदावर; रायगडमध्ये ५ वर्षांत एकाही प्रकल्पाची मुहूर्तमेढ नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:22 IST

प्रकल्पांसाठी जागेची उपलब्धता करण्यात येत असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: जिल्ह्यात ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणारे प्रकल्प मंजूर झाले आहेत. याद्वारे बेरोजगारीचा प्रश्न मिटणार असा दावा करण्यात येत असला तरी प्रकल्पांना मंजुरी मिळूनही एकही प्रकल्प पाच वर्षांत उभा राहिला नाही. दरम्यान, प्रकल्पांसाठी जागेची उपलब्धता करण्यात येत असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

महाविकास आघाडी आणि महायुती सरकार काळात ७० हजार कोटींचे औद्योगिक प्रकल्प रायगड जिल्ह्यात मंजूर झाले. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असून, रोजगाराचा प्रश्न सुटणार होता. मात्र, सद्य:स्थितीत प्रकल्प मंजूर आहेत, पण कागदावरच आहेत. 

मुरुड, रोह्यात प्रकल्प

रोहा, मुरुड या ठिकाणी राज्य सरकार अंतर्गत ३० हजार कोटींची गुंतवणूक असणारा औषध निर्मित प्रकल्प होणार आहे.  प्रकल्पात ३० ते ४०  हजार रोजगार निर्मिती होणार आहे. एकंदरीत ५५ हजार कोटींची गुंतवणूक प्रकल्प मंजूर झाले आहेत. राज्यातील प्रकल्प गुंतवणुकीत रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीच्या २७०० कोटी तर स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज कंपनीचा २०३४ कोटींच्या प्रकल्प गुंतवणुकीच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. 

आतापर्यंत काय घडले?

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद  कार्यक्रमात जिल्ह्यात २ हजार ३११ कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झालेले असून, यातून २ हजार ८६५ इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. जिल्ह्यात ७० हजार कोटींचे उद्योग प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून प्रस्तावित आहेत. 

रायगड जिल्ह्यात ६५ ते ७० हजार कोटींची गुंतवणूक करणारे प्रकल्प मंजूर आहेत. यासाठी काही प्रकल्पांना जागेची उपलब्धता झाली आहे, तर काही  प्रकल्पांना जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ती उपलब्धता होऊन हे प्रकल्प उभारले जातील.-उदय सामंत, उद्योगमंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :alibaugअलिबाग