शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

मुलांशी सकारात्मक सुसंवाद साधा

By admin | Updated: April 17, 2017 04:34 IST

आजचे युग संगणकाचे युग आहे. आजच्या मुलांमध्ये स्मरणशक्ती चांगली आहे. पुढे जाण्याची वेगळी ताकद त्यांच्यामध्ये आहे

अलिबाग : आजचे युग संगणकाचे युग आहे. आजच्या मुलांमध्ये स्मरणशक्ती चांगली आहे. पुढे जाण्याची वेगळी ताकद त्यांच्यामध्ये आहे. मात्र, अपयश पचविण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे मुलांना संगणकाचे ज्ञान देत असताना त्यांचे कौतुक करा. त्यांच्या कलागुणांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा. त्यांच्यावर भरपूर प्रेम करा. मुलांशी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सुसंवाद साधा जेणेकरून मानसिक व शारीरिकदृष्ट्या मुलांची वाढ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ तथा ‘चला मुलांना घडवू या’ या चळवळीचे प्रणेते डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी केले. अलिबाग नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, स्वच्छता व आरोग्य समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जागतिक आरोग्य दिनानिमित्त नगरपालिकेच्या शाळेमध्ये शाळेतील मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच घेण्यात आले. यावेळी डॉ. चंद्रशेखर दाभाडकर बोलत होते. यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, पाणीपुरवठा सभापती राकेश चौलकर, बांधकाम सभापती विजय झुंजारराव, वृषाली ठोसर, चित्रलेखा पाटील, अ‍ॅड. गौतम पाटील, सुरक्षा शहा, महेश शिंदे, प्रिया घरत, संजना कीर, राजश्री पेरेकर, शैला भगत, नईमा सय्यद, अनिल चोपडा, मुख्याधिकारी महेश चौधरी आदींसह शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी कोण, किती, काळा, गोरा, लठ्ठ, बारीक आहे, हे महत्त्वाचे नाही. तर त्या मुलांमध्ये असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर तो खूप मोठा व्यक्ती बनू शकतो. त्यामुळे मुलांनो मोठे होण्यासाठी खूप खेळा, खूप हसा, खूप अभ्यास करा, व्यायाम करा, परिश्रम घ्या, जेणेकरून आत्मविश्वास निर्माण होईल. शरीर सुदृढ ठेवायचे असेल, तर चॉकलेट खाण्यापेक्षा चांगला आहार घ्या. तरच बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत होईल, असे ते म्हणाले. इंडियन मेडिकल असोसिएशन, रायगड मेडिकल असोसिएशन, तसेच अलिबाग तालुका औषधे विक्र ेता संघ यांच्या सहकार्यातून चांगल्या कंपनीची औषधे विद्यार्थ्यांना तपासून मोफत वाटप करण्यात आली.