शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटील मानधनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:59 IST

सहा महिन्यांपासून रखडले : तळा तालुक्यात २९ पोलीस पाटील

तळा : प्रत्येक गावपातळीवर तंटे, हत्या, मारामारी, व शांतता राखण्याबाबत पोलीस ठाण्यास प्रथम माहिती देण्याची जबाबदारी असणारे पोलीस पाटील गेल्या सहा महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. पोलीस पाटलांना दरमहा तीन हजार रुपये मानधन मिळत होते. परंतु, ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार पोलीस पाटलांच्या मानधनात ३ हजार ५०० रुपयांची वाढ करून प्रतिमहिना ६ हजार ५०० रुपये मानधन केले. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पोलीस पाटलांच्या मानधनासाठी ११७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, अर्थसंकल्पानंतर पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ झाल्याने निधीअभावी नियमित मानधन देण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे.

तळा तालुक्यात २९ पोलीस पाटील कार्यरत आहेत नेहमीच पोलिसांच्या दिमतीला राहणारा हा पोलीस पाटील गावातील संभाव्य घडामोडींची गोपनीय माहिती काळविण्याचीही जबाबदारीही पार पाडतो. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस पाटलांना मानधनापासून वंचित राहावे लागल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे निधीची तरतूद करून लवकरच मानधन सुरू करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेकडून करण्यात येत आहे.आज गेले सहा महिने पोलीस पाटलांना मानधन मिळाले नसल्यामुळे मानधनावर निर्भर असणाऱ्याची आर्थिक कुचंबणा होत आहे शासनाने लवकर पोलीस पाटलांचा मानधनाचा प्रश्न मार्गी लावून मानधन सुरळीत सुरू करावे.- कमलाकर मांगले,महाराष्ट्र राज्य सचिव पोलीस पाटील संघटना

टॅग्स :Raigadरायगड