शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅपरेशन मुस्कान’मुळे पालकांचे चेहरे खुलले

By admin | Updated: August 4, 2015 03:09 IST

पोलिसांनी राबवलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मुळे हरवलेल्या ४६ मुलांचा शोध लागला आहे. शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण जुलै महिन्यात पोलिसांनी ही

नवी मुंबई : पोलिसांनी राबवलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’मुळे हरवलेल्या ४६ मुलांचा शोध लागला आहे. शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण जुलै महिन्यात पोलिसांनी ही मोहीम राबवली होती. सुमारे पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या काही मुलांचाही यादरम्यान शोध लागला आहे.शासनाच्या निर्देशानुसार १ ते ३१ जुलै दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी ‘आॅपरेशन मुस्कान’ राबवले. या मोहिमेअंतर्गत शहरातून हरवलेल्या मुलांचा अथवा सापडलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेण्यात आला. त्याकरिता आश्रयगृह, रेल्वे स्थानके, बस स्थानके आदी ठिकाणची अनाथ मुले, तसेच कचरावेचक व भीक मागणाऱ्या मुलांची माहिती एकत्रित केली. शासनाच्या निर्देशानुसार ही संपूर्ण माहिती संकेतस्थळावर भरली जात होती. त्यानुसार हरवलेल्या तब्बल ४६ मुलांचा शोध लागल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. आयुक्त प्रभात रंजन, अप्पर आयुक्त विजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांनी शोधलेल्या मुलांमध्ये २८ मुली तर १८ मुले आहेत. त्यांना राज्यात तसेच राज्याबाहेरच्या विविध ठिकाणांवरून ताब्यात घेवून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याशिवाय इतर ८ अल्पवयीन मुले संशयित व्यक्तींकडे आढळून आली आहेत. त्यांना बालसुधारगृहात ठेवून संबंधितांचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलीस करत आहे. या मोहिमेदरम्यान बहुतांश मुले कौटुंबिक कारणामुळे घरातून पळाल्याचेही समोर आले आहे. अंकुश सिंग हा ८ वर्षांचा मुलगा हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल होती. कौटुंबिक परिस्थिती बऱ्यापैकी असतानाही आई भीक मागायला पाठवायची. जर नाही गेला तर मारायची. मात्र भीक मागण्याऐवजी शाळेत जा असे सांगणारे वडीलही शाळेत नाही गेला तर मारायचे. त्यामुळे द्विधा मन:स्थिती झालेला अंकुश एक वर्षापूर्वी घर सोडून पळून गेला. पनवेल रेल्वे स्थानकात भीक मागताना तो अजाणतेपणे एक्स्प्रेस रेल्वेत चढल्याने तो थेट कर्नाटकात पोचला होता.