शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

पाली - खोपोली रस्त्यासाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 5:11 AM

एमएमआरडी अधिकाऱ्यांचे आश्वासन : खराब रस्त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

पाली : पाली ते खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. या रस्त्याच्या कामामुळे जुन्या रस्त्यावरून वाहतूक सुरू असून रस्त्यातील खड्डे, उडणाºया धुळीमुळे वाहनचालक आणि परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत तहसील कार्यालयात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर गुरुवारी याबाबतीत एमएमआरडीच्या अधिकाºयांनी कंत्राटदारबरोबर तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ग्रामस्थांना वीस दिवसांत रस्ता सुरळीत करण्याचे आश्वासन एमएमआरडी अतिरिक्त मुख्य अभियंता कर्नल रवी घोडके यांनी दिले.

रस्त्याचे रु ंदीकरण होत असताना सध्या वाहतूक होत असलेल्या रस्त्याच्या बाबतीत मात्र कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहे, यामुळे जुन्या रस्त्यावरून वाहतूक होत असून या रस्त्याला अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत तर रस्त्यावरील डांबरीकरण निघून गेल्याने रस्ते खराब झाले आहे. या रस्त्यांची डागडुजीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. तर रस्ता रु ंदीकरणाच्या कामात साइडपट्टी मातीने भरल्यामुळे मातीचा धुरळा उडत आहे याचा चालकांना त्रास होत आहे. वाहतुकीचा रस्ता सुरळीत न केल्यास सुधागड व खालापूर तालुक्यातील ग्रामस्थ तसेच राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार कार्यालयात दिला होता. त्यानंतर गुरुवारी बैठक घेऊन वाहनचालक, प्रवासी आणि ग्रामस्थांना दिलासा दिला आहे.

पावसाळ्याच्या दिवसात काम जोमाने सुरू होते, परंतु मागील दोन महिने हे काम बंद झाले होते. या संदर्भात पालक मंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने काम सुरू करावे असे आदेश दिले होते. परंतु कंत्राटदार रस्ता रु ंदीकरण व मूळ वाहतुकीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले. पाली ते खोपोली फाटा या साधारण ३५ किमीच्या रस्त्यात काही ठिकाणी रुंदीकरणाचे व दुरु स्तीचे काम बंद होते याचा त्रास चालकांना होत होता. यात ज्या रस्त्यावरील भाग काँक्र ीटचा झाला आहे त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे, परंतु काँक्र ीटचा रस्ता सुरू होतो व संपतो त्या ठिकाणी खड्डे पडले असून सर्वच वाहने आदळतात. अचानक वाहन चालक ब्रेक दाबत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे अशा अनेक मुद्द्यांची चर्चा या वेळी केली. बैठकीला सुधागड व खालापूर तालुक्यातील ग्रामस्थांसह परळीचे सरपंच संदेश कुंभार, मनसे तालुका अध्यक्ष सुनील साठे आदी उपस्थित होते.१ फेब्रुवारीपर्यंत होणार कामच्एमएमआरडी अतिरिक्त मुख्य अभियंता कर्नल रवी घोडके यांनी वराह इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीच्या वतीने ज्या कंपनीला काम देण्यात आले होते त्यांचा कामाचा अनुभव व नियोजन योग्य न केल्यामुळे ही परिस्थिती आली. आता काम बेग कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे देण्यात आले आहे. १ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण रस्ता वाहतुकीस योग्य करून देऊ आणि नंतर रु ंदीकरणाचे काम सुरु वात होणार आहे असे स्पष्ट केले. या वेळी मनसेच्या महिला जिल्हा चिटणीस लता कांबळे यांनी आपण शब्द पाळत नाही तर आंदोलन करून अधिकाºयांना डांबून ठेवू असा इशारा दिला आहे. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई