शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘पाली भूतीवली’चे पाणी बिल्डरांसाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:33 IST

कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली आहे.

- कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी पाली भूतीवली धरणाची निर्मिती शासनाने केली आहे. शासनाचा हा उद्देश पाली भूतीवली धरणात यशस्वी झालेला दिसत नाही. कारण धरणाच्या जलाशयात २००४ पासून पावसाचे पाणी साठून राहत असून पाटबंधारे विभागाने शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी कालवे बांधले नसल्याने शेती केली जात नाही. दरम्यान,पडून असलेले पाणी तेथील बिल्डर अनेक वर्षे वापरत आहेत, मात्र त्यावर शासनाचा कोणताही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.पाली भूतीवली धरण तेथील तीन गावे स्थलांतरित करून बांधण्यात आले असून परिसरातील १५ गावामधील ११०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी हे धरण बांधले गेले. १९९२ मध्ये धरणाचे काम सुरू झाले आणि धरणाची मुख्य भिंत २००४ मध्ये पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या जलाशयात पाणीसाठा झाला. मात्र त्यावेळपासून आजतागायत धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्याकरिता कालवे बांधण्यात आलेले नाहीत. पाटबंधारे खात्याला एवढ्या वर्षात कालवे बांधण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करता आले नाही. त्यामुळे मुख्य कालवा आणि उजवा तसेच डावा असे १५ किलोमीटर लांबीचे कालवे बांधून पूर्ण झाले नाहीत.परिणामी शेतीसाठी पाणी सोडता येत नाही अशी भूमिका पाटबंधारे खाते घेत असते. परंतु या धरणाची निर्मिती शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी करण्यात आली होती, पण शासनाचा हा उद्देश कागदावर राहिला असून धरणाचे पाणी बिल्डर लॉबीसाठी आंदण दिले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.>धरण उशाला आणि कोरड घशाला; ग्रामस्थांची अवस्थाधरणाच्या मुख्य जलाशयात वीज पंप टाकून त्याद्वारे पाणी उचलले जात असून त्यावर पाटबंधारे खात्याचे पर्यायाने शासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. कारण तेथील एका बिल्डरला पाणी देण्याचा पाटबंधारे खात्याने केलेला करार डिसेंबर २०१६ मध्ये संपला आहे असे असताना देखील धरणाच्या जलाशयातून पाण्याचा उपसा सुरू आहे.त्यावेळी धरणाच्या समोर असलेल्या आणि धरण ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे त्या ग्रामपंचायतीमधील सर्व वाड्यांना साधे पिण्याचे पाणी नाही. मात्र त्यावेळी बिल्डर लॉबी वापरत असलेल्या पाण्यावर त्या त्या ठिकाणी स्वीमिंग पूल पाण्याने भरलेले आहेत असे विदारक चित्र पाली भूतीवली धरण परिसरात आहे.धरण उशाला आणि कोरडा घशाला अशी स्थिती पाली भूतीवली हद्दीमधील ग्रामस्थांची झाली असून त्यात अधिक रहिवासी हे आदिवासी आहेत, त्यांना मात्र या पाण्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याचवेळी धरणाचे कालवे अनेक शेतकऱ्यांनी जमिनी देऊन देखील करण्यात येत नसल्याने स्थानिक लोकांनी पाटबंधारे खात्याला जबाबदार धरले आहे. पाटबंधारे विभाग बिल्डरसाठी आपले पाणी राखून ठेवत असून त्यांना पाणी देण्यासाठी धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याकरिता कालवे बांधले जात नसल्याचा आरोप देखील स्थानिक शेतकरी करीत आहेत.>आपण या धरणाच्या कामाला गती मिळावी म्हणून प्रयत्न केले आहेत, त्यामुळे धरणाची उभारणी ज्यासाठी झाली आहे,तो उद्देश सफल करण्यासाठी आपला शासन दरबारी पाठपुरावा सुरू राहील. कालवे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी देखील आपले प्रयत्न सुरू असून स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मानसिकता शेतीला पाणी मिळावे अशी दिसत नसल्याने शेतकरी वर्ग आपल्या शेतात कधी पाणी येणार याकडे चातकासारखी वाट पाहत आहे.- देवेंद्र साटम, माजी आमदार>धरणातील पाणी देण्याबाबतचे सर्व अधिकार कोलाड विभागीय कार्यालयाला असून तेथून कोणालाही पाणी देण्याचे कोणतेही निर्देश आले नाहीत. त्यामुळे सध्या त्या खासगी संस्थेला धरणातून पाणीपुरवठा सुरू असल्याबद्दल तत्काळ चौकशी केली जाईल. त्याचवेळी कालव्यांची कामे करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे केली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कालव्यांच्या कामांना सुरुवात होईल.- पी.सी. रोकडे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग>पाली -भूतीवली या धरणाची निर्मिती शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी करण्यात आली होती, परंतु अनेक वर्षे उलटूनही परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. या भागातील आदिवासी बांधवांना देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, परंतु त्यांना देखील या धरणाचे पाणी मिळत नाही. शासनाचा हा उद्देश कागदावर राहिला असून धरणाचे पाणी बिल्डर लॉबीसाठी आंदण दिले. बिल्डर धरणाच्या मुख्य जलाशयात वीज पंप टाकून पाणी उचलत आहे. पाटबंधारे खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने लवकरात लवकर या भागातील शेतकºयांना शेतीसाठी पाणी द्यावे, अशी परिसरातील आम्हा सर्व शेतकºयांची मागणी आहे.- हेमंत घारे, शेतकरी-उमरोली