शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश

By admin | Updated: April 17, 2017 04:32 IST

येथील समुद्रकिनारी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत राज्याचे मुख्य बंदर अधिकारी हे संतप्त झाले आहेत. याबाबतच्या तक्रार अर्जावरच त्यांनी

अलिबाग : येथील समुद्रकिनारी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत राज्याचे मुख्य बंदर अधिकारी हे संतप्त झाले आहेत. याबाबतच्या तक्रार अर्जावरच त्यांनी, आपले अधिकारी करतात काय, असा शेरा मारला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची निष्क्रीयता त्यामुळे उघड झाली. अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक बंदर अधिकारी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांना दिले आहेत. तसेच कार्यवाहीबाबत मुख्यालयाला अहवाल सादर करण्यासही फर्माविले आहे.येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी या अनधिकृत बांधकामाची तक्र ार ई-मेलद्वारे राज्याचे मुख्य बंदर अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या प्राप्त तक्र ारीची गंभीर दखल राज्याचे मुख्य बंदर अधिकारी यांनी घेतली. अलिबाग समुद्रकिनारी अलिबाग बंदर अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयाच्या जवळ समुद्रकिनाऱ्याच्या बंधाऱ्याला खेटूनच महसूल आणि बंदर खात्याची जागा आहे. या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू होते. ते थांबविण्याची मागणी अलिबाग येथील अश्रफ घट्टे यांनी अलिबाग नगरपालिकेकडे केली होती. त्यानंतर तेथील कामाला ब्रेक लागला होता. तेथील काम पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली लक्षात येताच संजय सावंत यांनी थेट राज्य सरकारकडे ४ एप्रिलला तक्र ार केली होती. अलिबाग नगरपालिकेने घट्टे यांना या बांधकामासाठी एमसीझेडएमए, पर्यावरण विभागाकडून परवानगी घेतली नसल्याचे कळविले होते. त्यानंतर नगरपालिकेने हे बांधकाम ‘हागणदारी मुक्ती’ या शासकीय योजनेचा भाग असल्याचे जाहीर केल्याने हे प्रकरण गाजले होते. आता राज्याच्या मुख्य बंदर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रकरणात कारवाईचे आदेश दिल्याने आमच्या तक्र ारीत तथ्य असल्याचेच सिद्ध झाले आहे, असे अश्रफ घट्टे यांनी सांगितले. याप्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरवा करणार असल्याचे सावंत म्हणाले.