गावठी बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू, घटनास्थळावर आढळले 25 बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:03 PM2021-11-24T12:03:25+5:302021-11-24T12:06:36+5:30

जखमींमध्ये 10 वर्षाच्या मुलाचा समावेश

One killed in village bomb blast in raigad, 25 bombs found at the scene | गावठी बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू, घटनास्थळावर आढळले 25 बॉम्ब

गावठी बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू, घटनास्थळावर आढळले 25 बॉम्ब

Next
ठळक मुद्देनिजामपूर विभागातील चन्नाट रस्त्यावर मशीदवाडी गावच्या हद्दीत माळरानात शेतावर धामणी नदीजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

रायगड : माणगाव तालुक्यातील निजामपूरजवळ गावठी हातबॉम्बच्या स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एक 10 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे तर त्याची आई किरकोळ जखमी झाली आहे. सदरची घटना मंगळवारी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिसांना 25 हातबॉम्ब सापडले आहेत. संदेश आदिवासी चौहान (वय - 45) याचा जागीच मृत्यू झाला. संदेश याची पत्नी मजिनाबाई संदेश चौहान (वय -40) तर मुलाचे नाव सत्यम संदेश चौहान(वय -10) आहे. सर्व रा. बिराहली ता.रिथी जि.कठनी राज्य मध्यप्रदेश.

निजामपूर विभागातील चन्नाट रस्त्यावर मशीदवाडी गावच्या हद्दीत माळरानात शेतावर धामणी नदीजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संदेश हा त्यांची पत्नी मजिनाबाई मुलगा सत्यम हे माणगाव तालुक्यातील मशीदवाडी गावच्या हद्दीत धामणी नदी शेजारी शेतातील माळरानात उघड्यावर राहत होते. मंगळवार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संदेश चौहान हा हात बॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला. त्यामध्ये संदेश यांच्या हाताला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

मुलगा सत्यम यास गंभीर दुखापत होऊन त्याची पत्नी माजीनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेतील गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी औषधोपचाराकरिता आणण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केल्यावर त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्यास अधिक औषधोपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनीही माणगाव उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. तर, रायगड जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी त्वरित आपल्या सहकार्‍यांसमवेत घटनास्थळाला भेट दिली.

घटनास्थळी काही अंतरावर एका झाडावर लपवुन ठेवलेले 25 गावठी हातबाँम्ब सापडले असून मध्यप्रदेशातील हे लोक पारधी समाजाचे असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. घटनास्थळीच गावठी बॉम्ब तयार करण्यात आले असावेत आणि ते हाताळताना त्याचा स्फोट झाला असावा, अशी प्राथमिक माहिती खेडकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान, सदर घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
 

Web Title: One killed in village bomb blast in raigad, 25 bombs found at the scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app