शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

अनंत गीतेंच्या संपत्तीत एक कोटीची वाढ; दोन कोटींचे कर्ज, एकही गुन्हा नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 7:38 AM

गिते यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आहे, असे दिलेल्या शपथ पत्रात म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघासाठी इंडिया आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात ८ कोटी १९ लाख ५९ हजार ७९८ रुपये ८९ पैसे एकूण संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या शपथ पत्रामध्ये सादर केलेल्या एकूण संपत्तीपेक्षा आता संपत्तीत १ कोटी ४९ हजार ४२० रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

त्यांच्यावर २ कोटी १३ लाख ४१ हजार २६८ रुपये इतके कर्ज आहे. गिते यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आहे, असे दिलेल्या शपथ पत्रात म्हटले आहे. गीते हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. सोमवारी गिते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१९ मध्ये उमेदवारी अर्ज करताना गिते यांनी शपथपत्रात सात कोटी १९ लाख १० हजार ३७८ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली एकूण संपत्ती चार कोटी ४४ लाख ६६ हजार ४८७ होती. 

२५ लाखांचे बाँडशपथपत्रात एफडी, टर्म खात्यात १ कोटी ७८ लाख ५५ हजार १९५ रुपये ८९ पैसे असून, २५ लाख १० हजारांचे बाँड, अशी २ कोटी ३४ लाख २० हजार ८५२ रुपये ८९ पैसे स्थावर मालमत्ता आहे. जंगम मालमत्ता ५ कोटी ७३ लाख ४९ हजार ७९८ रुपये ८९ पैसे असल्याचे शपथ पत्रात दिले आहे. गीते यांच्या नावावर २ कोटी १३ लाख ४१ हजार २६८ रुपये इतके कर्ज आहे. सोमवारी पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

तीन गीते मैदानातरायगड लोकसभा मतदारसंघात नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे राहतात. २०१९च्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचे नामसाधर्म्य असलेले उमेदवार देण्यात आले होते. आता गीतेंचे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे. १९ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून अजूनही नामसाधर्म्य असलेले उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे. 

नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांची दखल घेण्यासारखे काही नाही. प्रचाराची वैचारिक पातळी खालावली आहे. त्याला जास्त महत्त्व देणे गरजेचे नाही. राज ठाकरे हे एका पक्षाचे अध्यक्ष असून त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा आहे. आमची इंडिया आघाडी मजबूत असून त्यांच्या भूमिकेवर चर्चा करणे आवश्यक नाही. - अनंत गीते, उमेदवार, उद्धवसेना

टॅग्स :RaigadरायगडAnant Geeteअनंत गीतेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४