शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

इथेन गॅस पाइपलाइनचे नवे संकट

By admin | Updated: August 27, 2015 01:01 IST

महाराष्ट्रावर दुष्काळाचे गडद संकट असताना पेण हेटवणे सिंचन क्षेत्रातील ओलिताखालील दुबार भातशेती, कूळशेती, अनेक कृषीपूरक उद्योगांनी सुजलाम सुफलाम झालेली व यावर्षी बहरात

पेण : महाराष्ट्रावर दुष्काळाचे गडद संकट असताना पेण हेटवणे सिंचन क्षेत्रातील ओलिताखालील दुबार भातशेती, कूळशेती, अनेक कृषीपूरक उद्योगांनी सुजलाम सुफलाम झालेली व यावर्षी बहरात आलेल्या भातशेतीवर केंद्र सरकारने सक्तीच्या भूसंपादनाचा हातोडा मारला आहे. यामुळे रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनच्या प्रोजेक्टच्या टाचेखाली इथला प्रगतशील शेतकरी चिरडला जाणार आहे. केंद्र सरकारने निवडणूक काळात उद्योगपतींना दिलेले आश्वासन पाळून रिलायन्स इंडस्ट्रीच्या प्रोजेक्टसाठी राजपत्रित अशी निविदा काढून सक्तीच्या भूसंपादनाच्या अतिरिक्त बडगा उगारुन कोट्यवधी किमतीची ही शेतजमीन कवडीमोल भावाने सक्तीच्या भूसंपादनाखाली घेण्याचा डाव खेळला आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर आता रिलायन्सची पुन्हा दादागिरी सुरु होणार असल्याने शेकाप आ. धैर्यशील पाटील या प्रकल्पाविरोधात कोणती भूमिका घेतात याकडे विरोधी राजकीय पक्षासह सामान्य जनतेचे व शेतकरीवर्गाचे लक्ष लागले आहे. गॅझेट आॅफ इंडिया भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाने गुजरात दहेज ते नागोठणे रायगड अशी महाराष्ट्र व गुजरात राज्यांना जोडणाऱ्या १८ मीटर रुंदीच्या पाइपलाइनद्वारे इथेन गॅस हा ज्वालाग्राही वायू नेणार आहेत. नागोठणे येथील रिलायन्स पेट्रोकेमिकल्समध्ये तयार होणाऱ्या या इथेन वायूमुळे येथील नागरिकांनासुद्धा धोका संभवतो. हेटवणे मध्यम प्रकल्प हा सिंचनावर आधारित प्रकल्प असल्याने येथील शेतात वर्षभरात चार पिके घेतली जातात. या प्रकल्पात शेतकऱ्यांबरोबर आदिवासी, कातकरी समाजाच्या मालकीच्या जमिनी जाणार आहेत. राज्याच्या शेतजमिनीचा दर्जा पाहता हेटवणे ओलिताखालील या जमिनींना भरपूर पाणी असल्याने येथील कृषीसंपदा बावनकशी सोनं आहे. या ठिकाणी अव्वाच्या सव्वा भावाने काही शेतकऱ्यांनी २००७ मध्ये शेतजमिनी रिलायन्सने पेणमध्ये मुंबई एसईझेड प्रकल्प आल्यानंतर खरेदी केल्या. त्या जमिनीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करुन शेडनेट, पोल्ट्रीफार्म, आंबा लागवड, फूलशेती अधिक उत्पादन देणारी पिके घेतली आहेत. सिंचनाच्या ओलिताखालील शेतजमीन सक्तीच्या भूसंपादनात घेता येत नाही, असा कायदा असताना सर्व नियम धाब्यावर बसवून सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी या हरितपट्ट्यात रेड कार्पेट अंथरले आहे. राज्य सरकारने येथील परिसर पर्यटनस्थळ म्हणून घोषित केला आहे. येथे विनोबा भावेंचे गागोदे जन्मगाव आश्रम, व्याघ्रेश्वर पर्यटन विकास क्षेत्र हेटवणे धरण, हेटवणे पुनर्वसित नवी वसाहत, भोगावती नदी व निसर्गरम्य अशी प्राकृतिक वनसंपदा आहे, या क्षेत्रातून ही पाइपलाइन नागोठणे बाजूकडे जाणार आहे. एकरी २ कोटींचा बाजारभाव असलेल्या जमिनीचे या इथेन वायू पाइपलाइन प्रकल्पामुळे नुकसान होणार आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांना बजावल्या सक्तीच्या नोटिसा; ठाण्यात जनसुनावणीरेड कार्पेट प्रयोजनाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सूर्या प्रकल्प डहाणू-ठाणे अभय कलगुटकर यांच्यावर आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीच्या भूसंपादनाच्या नोटिसा हेटवणे-सिंचन प्रकल्पातील सुपीक जमिनींना बजावल्या आहेत. याबाबतची जनसुनावणी ठाणे येथे घेण्यात आल्याचे समजते. पेणचे शेतकरी याबाबत अनभिज्ञ असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन होणार आहे तेथे जनसुनावणी घेणे आवश्यक असताना ती टाळण्यात आली आहे. रिलायन्सच्या एसईझेड प्रकल्पाच्या जनसुनावणीत मतदान झाले होते. त्यावेळी ९५ टक्के शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या विरोधात मतदान करुन प्रकल्प हद्दपार केला होता. एसईझेडला हद्दपार करणारे शेकाप नेते आता रिलायन्स पुन्हा त्याच्या राहत्या घराशेजारी व स्वत:च्या शेतामध्ये उभा आहे. हेटवणे ओलिताखालील इंचभर जमीन रिलायन्सला न देणारे आमदार धैर्यशील पाटील आता या रिलायन्स प्रकल्पाबाबत कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनीमधून ही पाइपलाइन जाते, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही यापूर्वीही लढलो आहे,व्यापक आंदोलन केले आहे. एकीकडे सरकार इको सेन्सीटिव्ह झोनमधून प्रकल्प नेण्यास विरोध करते तर दुसरीकडे हेटवणे सिंचन प्रकल्पात ओलिताखाली येणाऱ्या जमिनीवर असे प्रकल्प राबवत आहे. राज्य सरकारने येथील परिसर पर्यटनस्थळ म्हणून घोषित केला आहे. आम्ही रिलायन्सच्या इथेन गॅस पाइपलाइनच्या प्रकल्पाचा नीट अभ्यास करून विरोध करु . आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू.- आमदार धैर्यशील पाटील