शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा तालुक्यातील नवाबकालीन मराठी शाळा होणार जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 23:42 IST

नागरिक संतप्त : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : राज्य सरकारने सर्व शाळांमध्ये मराठी सक्ती केली असली, तरी म्हसळा शहरातील १४५ वर्षे जुन्या नवाबकालीन मराठी शाळेला नगरपंचायतीचे ग्रहण लागल्याने आता अनेकांच्या आठवणातील ‘ती’ शाळा आता जमीनदोस्त होणार आहे. शाळा तोडून नगरपंचायत इमारत बनवण्यासाठीचा ठराव रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

म्हसळा शहरातील नगरसेवकांसाठी सद्यस्थितीत असणारे नगरपंचायत कार्यालय अपुरे पडत असल्याने या नगरसेवकांना स्वत:च्या बसण्याकरिता देशासाठी उद्याचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्याचा डाव यशस्वी झाला आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक १२ (१६) मध्ये नऊ गुंठ्यात असणारी राजिप शाळा न.१ गावठाण क्रं.१/१८७ या शहरातील मध्यवर्ती नवाबकालीन शाळा पाडून नगरपंचायत इमारत बांधण्यासाठी ना हरकत दाखला देण्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात मराठी भाषा टिकावी म्हणून सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यात आली असली, तरी मराठी भाषा हद्दपार व्हावी म्हणून रायगड जिल्हा परिषद प्रयत्न करीत असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील म्हसळा शहरातून चक्क १४५ वर्षे जुनी सद्यस्थित १५९ पट असणारी नवाबकालीन मराठी शाळा काही राजकीय लोकप्रतिनिधी आपल्या फायद्यासाठी हद्दपार करत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष सुनील अंजार्लेकर यांनी केला आहे.

म्हसळा शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक १ मध्ये तालुक्यातील इतर मराठी शाळा बंद झाल्यामुळे त्या गावातील विद्यार्थीही शिक्षण घेण्यासाठी येतात. आमची मराठी भाषा टिकावी, आमची मराठी शाळा वाचावी, यासाठी आम्ही ही शाळा तोडू देणार नाही. शाळा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू.- सुनील अंजार्लेकर,अध्यक्ष, कुंभार समाज तथाउपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन कमिटी

टॅग्स :Schoolशाळा