म्हसळ्यात शिक्षकाकडून आरोग्य सेविकेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:20 AM2018-10-02T04:20:51+5:302018-10-02T04:21:22+5:30

तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा ताम्हाणे करंबे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यासाठी

Molestation of health worker by teacher in Mhasan | म्हसळ्यात शिक्षकाकडून आरोग्य सेविकेचा विनयभंग

म्हसळ्यात शिक्षकाकडून आरोग्य सेविकेचा विनयभंग

Next

म्हसळा : तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा ताम्हाणे करंबे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक आरोग्य सेविका गेल्या होत्या. यावेळी शाळेतील शिक्षक कमलाकर ज्ञानदेव धुलगुंडे यांनी त्यांचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

आरोग्यसेविकेने याबाबत म्हसळा पंचायत समिती गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली. मात्र तब्बल २० दिवस उलटूनही दोषी शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. वरिष्ठांकडून याप्रकरणी कारवाई होत नसल्याचे पाहून अखेर आरोग्यसेविकेने म्हसळा पोलीस ठाण्यात दोषी शिक्षकाविरु द्ध तक्र ार दाखल केली आहे.

Web Title: Molestation of health worker by teacher in Mhasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.