शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

पोलादपूरमध्ये मनसेचे आंदोलन सुरू; पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्तीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:45 AM

पोलादपूर नगरपंचायत झाली असली तरी नगरपंचायतचा कारभार मुख्याधिकाºया विना असून नसल्या सारखा झाला आहे.

पोलादपूर : पोलादपूर शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापासून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिलेल्या इशाºयानुसार मनसेतर्फे पोलादपूर नगरपंचायत कार्यालयसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

पोलादपूर नगरपंचायत झाली असली तरी नगरपंचायतचा कारभार मुख्याधिकाºया विना असून नसल्या सारखा झाला आहे. चार वषापासून पोलादपूरचा कारभार कधी पोलादपूरचे अल्प काळासाठी उपलब्ध असणाºया मुख्याधिकाºयां मार्फत तर कधी अतिरिक्त कारभार पाहणाºया महाड, माणगाव, म्हसळाच्या मुख्याधिकाºयांकडे सोपविण्यात येत असल्याने पोलादपूरमधील कामकाज थंडावले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलादपूर मनसे तर्फे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांना अलिबाग येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले होते .

या निवेदन द्वारे पोलादपूर नगरपंचायत स्थापन झाल्या पासून नगरपंचायतसाठी पूर्ण वेळ प्रशासकीय प्रमुख पद असलेले मुख्याधिकारी पद हे रिक्त राहिले होते. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये नितीन गाढवे हे कारभार सांभाळत होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते रजेवर गेले आहेत. पोलादपूर नगरपंचायतचा कारभार महाड नगरपरिषदचे मुख्याधिकारी हे प्रभारी कामकाज म्हणून पहात आहेत.

विविध कामकाजासाठी येणाºया जनतेला दाखल्यांसह विविध कागदपत्रांसाठी पोलादपूर नगरपंचायतमध्ये ताटकळत बसावे लागते आहे. तसेच नगरपंचायतीच्या कारभारावर देखील काही प्रश्नचिन्ह निवेदनात व्यक्त करण्यात आले आहेत. या सर्व घटकांची चौकशी करण्यासाठी प्रशासकीय प्रमुख असलेले मुख्याधिकारी हे पद तातडीने नियुक्त होणे गरजेचे असल्याचे निवेदनद्वारे सूचित करण्यात आले होते .या निवेदनाची कोणत्याही प्रकारची दखल जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय यंत्रणेने न घेतल्याने मनसेने धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

टॅग्स :Raigadरायगड