फार्महाऊस बुक करण्यापूर्वी १०० वेळा विचार करा! स्नान करताना महिलांचे व्हिडिओ काढणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:01 IST2025-10-28T09:56:02+5:302025-10-28T10:01:52+5:30
स्पाय कॅमेरा बसवून महिला बाथरूममध्ये अंघोळ करत असतानाचा काढले व्हिडीओ

फार्महाऊस बुक करण्यापूर्वी १०० वेळा विचार करा! स्नान करताना महिलांचे व्हिडिओ काढणारा अटकेत
नवीन पनवेल : स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ शूटिंग करून अश्लील चित्रण करण्यात आले. या प्रकरणी धानसर येथील रियान्स फार्म हाऊसचा मॅनेजर मनोज भगवान चौधरीला तळोजा पोलिसांनी अटक केली.
चौधरी याने धानसर येथील फार्म हाऊस भाड्याने चालवण्यासाठी घेतले आहे. २५ ऑक्टोबर रोजी हे फार्म हाऊस काही नागरिकांनी बूक केले. २५ ऑक्टोबर दुपारी दोन ते २६ ऑक्टोबर रात्री दोनच्या दरम्यान मनोज चौधरी याने बाथरूममध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणात स्पाय कॅमेरा बसवून महिला बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी व कपडे बदलण्यासाठी गेले असता त्यांची व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. कॅमेऱ्याद्वारे शूटिंग होत असल्याचे लक्षात येताच महिलांनी तळोजा पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मनोज चौधरी याला अटक केली. त्याने यापूर्वीदेखील अशा प्रकारे महिलांचे चित्रण केले आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.