शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

माई महोत्सवात अवयवदानाचा संकल्प!

By admin | Updated: April 18, 2017 06:46 IST

जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी संस्थेद्वारे थोर तत्त्वज्ञ सद्गुरू वामनराव पै यांच्या पत्नी शारदामार्इंच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त १४ ते १६ एप्रिल दरम्यान

मुंबई : जीवनविद्या मिशन या शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी संस्थेद्वारे थोर तत्त्वज्ञ सद्गुरू वामनराव पै यांच्या पत्नी शारदामार्इंच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त १४ ते १६ एप्रिल दरम्यान सायंकाळी ५ ते ९ या वेळेत एस.आर.पी.एफ. मैदान, पश्चिम द्रुतगती महामार्ग, एनएच-८, जयकोच, जोगेश्वरी (पू.) येथे भव्य ज्ञानप्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सुरुवात १४ एप्रिल रोजी एका विशेष अभियानाने करण्यात आली. या महोत्सवानिमित्त जीवनविद्या मिशनतर्फे ‘अवयवदान’ हे अभियान यंदा राबविण्यात येत आहे.विशेष म्हणजे या तीन दिवसांच्या महोत्सवादरम्यान हजारो लोकांनी अवयवदानासाठी उत्स्फूर्त नावनोंदणी केली. या अभियानांतर्गत शुक्रवार, १४ रोजी जीवनविद्या मिशनच्या बालसंस्कार वर्गात जाणाऱ्या लहान मुलांनी ‘आदर्शांचे आदर्श’ या नवनाट्यातून प्रचंड जनसमुदायाकडे अवयवदानाबद्दल आवाहन केले. या नवनाट्यामधील एक विशेष भूमिका सद्गुरूंचा पणतू यश निखिल पै याने रंगविली. प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. विद्याधर लाड व सांगलीचे प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. प्रदीप पटवर्धन यांनी अवयवदान या विषयाबद्दल लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी उत्तम असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये सद्गुरूंच्या शिष्या डॉ. विद्या जोशी यांनी ‘आरोग्य मनाचे’ या विषयावर मार्गदर्शन केले. या महोत्सवामध्ये १५ एप्रिल रोजी प्रल्हाद वामनराव पै यांचे ‘देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरसी’ या विषयावर आधारित आगळेवेगळे असे दिव्य कीर्तन झाले. १६ एप्रिल हा मार्इंचा वाढदिवस असल्याने या दिवशी सर्व नामधारकांच्या उत्साहाला तर अक्षरश: पारावर नव्हता. मार्इंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वधू-वरांचा विवाह उपासनायज्ञाच्या उद्घोषामध्ये पार पडला. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये कोणतेही कर्मकांड केले जात नसून केवळ नामघोष केला जातो. या कार्यक्रमासाठी तीन दिवसांमध्ये राज्यमंत्री रवींद्र वायकर, आ. सुनील प्रभू, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक आदी उपस्थित होते.