पेणमधील ग्रामपंचायतींवर अवतरणार ‘महिला राज’, तालुक्यातील ६४ गामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 08:21 AM2021-01-22T08:21:23+5:302021-01-22T08:22:27+5:30

यावेळी झालेल्या सोडत पद्धतीत अनुसूचित जाती महिला राखीव - गागोदे खुर्द, अनुसूचित जमातीमध्ये १४ जागांपैकी ७ जागा महिलांसाठी राखीव तर ७ जागा या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत.

'Mahila Raj' on Gram Panchayats in Pen | पेणमधील ग्रामपंचायतींवर अवतरणार ‘महिला राज’, तालुक्यातील ६४ गामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

पेणमधील ग्रामपंचायतींवर अवतरणार ‘महिला राज’, तालुक्यातील ६४ गामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

googlenewsNext

पेण : तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सन २०२१ ते २०२५पर्यंतच्या सरपंच पदांसाठीचे आरक्षण सोडत पद्धतीने करण्यात आले आहे. यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी सुबोध सचिन घरत याच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडतीचे निकाल जाहीर करण्यात आले.
यावेळी झालेल्या सोडत पद्धतीत अनुसूचित जाती महिला राखीव - गागोदे खुर्द, अनुसूचित जमातीमध्ये १४ जागांपैकी ७ जागा महिलांसाठी राखीव तर ७ जागा या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत. यामध्ये महिला राखीव - सापोली, आंबिवली, आंबेघर, शेडाशी, करंबेली, बोरगाव आणि कोपर तर यामधील खुला गट वरवणे, रोडे, जिणें, कामार्ली, पाटणोली, वाशिवली, शिहू या एकूण १४ जागांचा समावेश आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गात महिलांसाठी राखीव ८ जागांमध्ये काराव, दुष्मी, जोहे, कुहिरे, कासू, महलमिऱ्या डोंगर, दादर, जिते या ग्रामपंचायती असून, या प्रवर्गातील खुल्या गटात खारपाले, सावरसई, निधवली, करोटी, झोतिरपाडा, ङोलवी, कोप्रोली, कांदळे, कोलेटी. सर्वसाधारण गटात महिलांसाठी १६ राखीव जागा आहेत. यामध्ये जावळी, कणे, खरोशी, निगडे, काळेश्री, दीव, बोर्झे, मुढांणी, वारसई, मलेघर, वडखळ, पाबळ, तरणखोप, बेणसे, बळवली, बोरी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या प्रवर्गात खुल्या गटात दूरशेत, शिक्री, वाकरुळ, रावे, वाशी, मसद बुद्रुक, वरेडी, आमटेम, सोनखार, उंबर्डे, अंतोरे, वरप, हमरापूर, बेलवडे बुद्रुक, वढाव, कळवे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 
 यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार अरुणा जाधव, नायब तहसीलदार धनंजय कांबळे, नायब तहसीलदार प्रमोद जाधव आदी उपस्थित होते. 

३२ जागांवर महिला  -
तालुक्यातील एकूण ६४ ग्रामपंचायतींमध्ये ३२ जागांवर महिला आरक्षण तर ३२ जागा  त्या-त्या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत. शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी ५० टक्के राखीव  जागा सोडतीमध्ये काढण्यात आल्याने पेण तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’ अवतरणार आहे.

Web Title: 'Mahila Raj' on Gram Panchayats in Pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.