राहुल गांधींच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2023 16:52 IST2023-03-28T16:52:09+5:302023-03-28T16:52:21+5:30
देशभरात कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रद्द केलेल्या खासदारकीचा विषय चांगलाच गाजत आहे.

राहुल गांधींच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
लोकमत न्युज नेटवर्क
पनवेल:काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने दि.28 रोजी शहरातील शिवाजी चौकात धरणे आंदोलन छेडण्यात आले.महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनाला उपस्थित होते.
देशभरात कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रद्द केलेल्या खासदारकीचा विषय चांगलाच गाजत आहे.कॉग्रेसने याबाबत भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात आंदोलन सुरु केले असताना पनवेल मध्ये महाविकास आघाडी या आंदोलनाच्या माध्यमातुन एकत्र येत भाजपचा निषेध केला. कॉग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना (ठाकरे गट),शेकाप एकत्र येत भाजप सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी भाजपवर सडकून टीका करत हा लढा राहुल गांधी यांच्या खासदारकीचा नसुन हा लढा संविधान वाचविण्याचा असल्याचे सांगितले.भाजप हुकूमशाही पद्धतीने देशाचा राज्यकारभार चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कॉग्रेसचे नेते महेंद्र घरत,प्रदेश उपाध्यक्षा चारुशीला टोकस, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील यांनी देखील भाजपच्या निषेधार्थ जोरदार भाषणे करीत भाजपचा निषेध केला.यावेळीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हासंपर्कप्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, काँग्रेस नेते आर.सी.घरत, हेमराज म्हात्रे, काशिनाथ पाटील,हेलमता म्हात्रे,श्रृती म्हात्रे,नारायणशेठ घरत,देवेंद्र मढवी यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.