शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

माघी गणेशोत्सव सुरू : जिल्ह्यात दुमदुमला गणरायाचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 3:48 AM

रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ५८ ठिकाणी माघी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

अलिबाग - रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ५८ ठिकाणी माघी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग किल्ल्यातील ३५० वर्षांपूर्वीचा आंग्रेकालीन गणेशपंचायतन, पाली येथील बल्लाळेश्वर, खालापूर-महडचा वरदविनायक आणि मुरुड-नांदगावच्या सिद्धिविनायक गणेश मंदिरांचा समावेश आहे. या ठिकाणी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.अलिबाग किल्ल्यातील बाप्पाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कुलाबा किल्ल्याला विद्युत रोषणाई, रंगबिरंगी पताका, आकर्षक रांगाळ्या काढून भक्तांचा उत्साह द्विगुणित केल्याचे दिसून आले. मुंबई, ठाणे, पुण्यासह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.भरतीच्या कालावधीत भाविकांनी बोटीतून प्रवास करून बाप्पाचे दर्शन घेतले. तर काही भाविकांनी ओहोटी लागल्यावर किल्ल्यात जाणे पसंत केले. मोठ्या संख्येने येथे भाविक दाखल झाल्याने बोट सेवा पुरवणारे आणि घोडागाडीचा व्यवसाय करणारे यांची चांगलीच चंगळ झाली.मंदिरामध्ये बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सुयोग्य पद्धतीने बॅरिकेड्स लावण्यात आल्याने गर्दीमुळे भाविकांना त्रास झाला नाही. मंदिर परिसरामध्ये हार-फुले, पूजा साहित्य विक्रीची दुकाने सजली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कमी झाल्याचे दिसून आले नाही. भाविकांमुळे अलिबागच्या समुद्रकिनाºयावर प्रचंड गर्दी असल्याने जत्रेचे स्वरूप आले होते. त्या ठिकाणच्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल खवय्यांनी गजबजून गेले होते.

बाप्पाच्या उत्सवानिमित्त जिल्ह्यातील गणेश मंदिरांमध्ये सत्यनारायण महापूजेचेही आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात होता.पालीत दर्शनासाठी भक्तांची मांदियाळीपाली : माघी गणेशोत्सवानिमित्ताने सुधागड-पाली येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या नवसाला पावणाºया बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी राज्यभरातील भक्तांनी पहाटे ४ वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. याच दिवशी उरण, खारपाले, पाबळ-झोपडे येथील मंडळे बल्लाळेश्वराची पालखी घेऊन पायी आले होते. त्या भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता. उन्हामुळे भाविकांना त्रास होऊ नये यासाठी देवस्थानकडून जागोजागी मंडप उभारण्यात आले होते. माघी गणेशोत्सवानिमित्त मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. दोन दिवसांच्या या यात्रेत लाखो रु पयांची उलाढाल होते. या यात्रेत मोठमोठे आकाश पाळणे, फनीगेम, जादूचे प्रयोग, चायनामेड वस्तूंची दुकाने, महिलांना खरेदीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंची दुकाने तसेच बच्चेकंपनीसाठी खेळणी व मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती.रात्रीच्या वेळेस मंदिराला केलेल्या रोषणाईने बल्लाळेश्वराच्या मंदिराचे दृश्य अगदी डोळ्याचे पारणे फेडून जाणारे असे दिसते. तालुक्यातील, परिसरातील लोक रात्री उशिरापर्यंत यात्रेत येतात. पाली तहसीलदार बी.एन.निंबाळकर, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व देवस्थान ट्रस्टचे सरपंच धनंजय धारप आदीच्या नेतृत्वाखाली माघी गणेशोत्सवाचे नीटनेटके नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये देवस्थानच्या वतीने मोफत पार्किंग, दर्शनासाठी नियोजनबद्ध रांगा, भाविकांना पिण्यासाठी पाणी, चहा व मोफत नाश्त्याची सोय केली आहे.वाहतुकीवर नियंत्रणासाठी २० वाहतूक पोलिसांसह एकूण ९० पोलिसांचा फौजफाटा तैनात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जागोजागी पोलीस नियंत्रण कक्ष उभारले आहेत. प्रथमोपचारासाठी पाली आरोग्य केंद्राच्या वतीने एक पथक असून, रात्रीच्या वेळेत विद्यतपुरवठा खंडित होऊ नये याकरिता महावितरणचे उपअभियंता बोईने यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कर्मचारी तत्परतेने काम पहात आहेत, तसेच गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्काउट गाइड व आरएसपीचे विद्यार्थी व काही समाजसेवी संघटनादेखील आपले काम चोख बजावत होती.माणगाव : कोकणात माघी गणेशोत्सवाला जास्त महत्त्व आहे. गजाननाची अनेक जागृत देवस्थाने आहेत अशापैकीच एक असलेल्या माणगावजवळील मुगवलीच्या गणपतीचे स्थान हे जागृत म्हणून परिचित आहे. या मंदिरात श्रीगणेशाच्या दर्शनासाठी शुक्रवारी भाविकांनी गर्दी के ली होती. मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून तीन किलोमीटर अंतरावर मुगवली फाटा आहे. तेथून दीड किमी अंतरावर हे स्वयंभू गणेश मंदिर आहे. मुगवली हे सव्वाशे घरांचे छोटे गाव असले तरी या गणेश मंदिरामुळे परिचित आहे.आगरदांडा : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्रीगणेशजयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. मुरुड कुंभारवाडा येथे गेले १९ वर्षे संतोष दर्ग यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेश याग, गणेश जन्मसोहळा करण्यात आला. येथील श्रीसिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पंचक्र ोशीतच व शहरातील गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.पेणमध्ये वाजतगाजत बाप्पाचे आगमनपेण : पेण शहर व ग्रामीण परिसरात माघी गणरायाचे शुक्रवारी सकाळी वाजतगाजत भजनी मंडळाच्या उपस्थितीत सार्वजनिक उत्सव सभामंडपात उत्साहात आगमन झाले. दुपारी १२.३० वाजता श्रींची विधिवत पूजा झाली. पाच दिवस चालणाºया माघी गणेशोत्सवासाठी पेणमध्ये जवळपास १०० बाप्पांचे आगमन झाले आहे. एकंदर आठवडाभर या माघी गणेशोत्सवाची धूम चालणार असून धार्मिक पूजापाठ, ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, सांस्कृतिक व क्रीडा सामन्यांचे आयोजन या गणेशोत्सवप्रसंगी करण्यात आलेले आहे. चावडी गणेश मंदिरात महिलांचे अथर्वशीर्षपठण झाले. माघी गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्साहत वर्षागणिक वाढतच असून पूर्वापार गणेश मंदिरापुरता सीमित असलेल्या या उत्सवाने भाद्रपदातील गणेशोत्सव सारखी भव्यता जोपासली आहे. पेण शहर ते ग्रामीण खारेपाट विभागात शंभरापेक्षा जास्त ठिकाणी सार्वजनिक मंडळाचे बाप्पा उत्सव सभामंडपात विराजमन झाले आहेत. काही गावामध्ये ही संख्या पाचपेक्षा अधिक आहे. पेण शहरात सात सार्वजनिक मंडळांचे बाप्पा तर खासगी २५ ठिकाणी स्थापना झाली असून कणे, बोर्झे, वाशी, वढाव, हमरापूर, जोहे, दादर, रावे, वाशीनाका, उचेडे, कांदळे, वडखळ, डोलवी, गडब, शिर्की, उर्णोली, दादर, रावे या गावांमध्ये माघी गणराय सार्वजनिक सभामंडपाबरोबरीने घरोघरी बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना झालेली आहे.खोपोली : मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या अष्टविनायक क्षेत्र महड गावात आज माघी गणेशोत्सवानिमित्ताने हजारो भाविकांनी वरद विनायकाचे दर्शन घेतले. पाली येथील ह.भ.प.गद्रे महाराज यांचे सुंदर कीर्तन सकाळी आयोजित करण्यात आले होते. मंदिरात भव्य अशी कडधान्यांची रांगोळी वरद विनायक फूल रांगोळी मंडळ यांनी साकारली होती. रांगोळीचे मोहक दृश्य भक्तगणांचे लक्ष वेधून घेत होते. रांगोळी काढण्यासाठी १३ कडधान्यांचा वापर करण्यात आला. रांगोळीसाठी २० तास एवढा कालावधी लागला. या रांगोळीसाठी साबुदाणे, मूगडाळ, मसुरडाळ ,मटकी, नाचणी, काळे तीळ, तांदूळ, पिवळी मोहरी आदी कडधान्यांचा वापर करण्यात आला. या रांगोळीमध्ये गणपती असून भगवान शंकर, छत्रपती शिवाजी महाराज यांंचे चित्र फुलांच्या रांगोळीच्या माध्यमातून साकारले.म्हसळा : तालुक्यात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. म्हसळा शहर, आगरवाडा, गणेशनगर, पाणदरे आदी ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पहाटेपासून विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. म्हसळा येथील गणेश मंदिरात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रोहा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार सुषमा भावे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. असंख्य भाविकांनी श्री गणेश दर्शन व कीर्तनाचा लाभ घेतला. कुडगाव कोंड येथेही गणेशोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ अशा पाणदरे येथेही मुंबई मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ यांच्या विद्यमाने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.मुरु ड : तालुक्यातील नांदगाव सिद्धिविनायक मंदिरात शुक्रवारी सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती. मुख्य रस्त्याला लागून हे मंदिर असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अलिबाग मुख्यालयातून विशेष पोलीस बंदोबस्तासाठी मागवण्यात आले होते. तसेच या दिवशी मोठ्या जत्रेचे स्वरूप आले होते. विविध मिठाईची दुकाने,वेगवेगळ्या वस्तूंचे विक्र ी स्टॉल यामुळे यात्रा सजली होती. स्थानिकांसह बाहेरगावातून भक्तगण आल्याने दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिस्ते गावातील २३वा माघी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. शुक्र वारी सकाळी आरतीपासून श्रींच्या पूजेला सुरु वात झाली. त्यानंतर दुपारी १२ वाजता मंदिरामध्ये पाळणा बांधून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आरती, गणेशपूजन त्यानंतर मंदिरामध्ये महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. या उत्सवाद्वारे समाज प्रबोधन, सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे याकरिता अखंड आगरी समाज व जाखमाता महिला मंडळ शिस्ते

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई