शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

Lok Sabha Election 2019: तटकरे, गीतेंच्या सरळ लढतीत गटबाजीचे अडथळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:40 PM

विकासकामे, सोयीसुविधांच्या जोरावर मतांचा जोगवा

- गणेश चोडणेकर आगरदांडा : रायगड मतदारसंघात गटबाजीचे वारे वाहू लागले असून, आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यातून कसा मार्ग काढतात, हे येत्या दीड-दोन महिन्यात कळेल. सुनील तटकरे आणि अनंत गीते यांची सरळ लढत दुसऱ्यांदा होत आहे.मागील निवडणुकीत तटकरेंनी अनंत गीते यांना चांगलाच घाम फोडला होता. १५ लाख १३ हजार मतदारांमधून गीतेंना अवघ्या २ हजार ११० मतांनी विजय मिळवता आला होता. आता पाच वर्षांनंतर यात अनेक बदल झाले आहेत. दोघांचेही हे पारंपरिक मतदारसंघ असले तरी अंतर्गत गटबाजीमुळे दोघांनाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. विकासकामे, मतदारसंघात केलेल्या सोयी -सुविधांच्या जोरावर मतांचा जोगवा मागण्यात दोन्ही उमेदवार यशस्वी होतात की नाही, हेही लवकरच कळेल.तटकरेंच्या वाटेतील काटेगुहागरचे आमदार भास्कर जाधवांच्या खासदारकीच्या हट्टाकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दुर्लक्ष करत सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली. यातून तटकरेंनी पहिला अडथळा दूर करण्यात यश मिळविले असले तरी मतदार संघातील अनेक गटा-तटांना तोंड द्यावे लागणार आहे. तटकरे कुटुंबातूनच याची सुरुवात होऊ शकते. मागील काही दिवसांपासून शांत बसलेले श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आपली कोणतीही बाजू अद्याप स्पष्ट केलेली नाही. ऐन निवडणूक कालावधीत अवधूत तटकरेंनी आपल्या भूमिकेत बदल केल्यास मोठा फटका सुनील तटकरेंना बसू शकतो. सुनील तटकरेंच्या पाठीशी सध्यातरी शेकापची मजबूत ताकद आहे. मात्र, तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा वैर सर्वश्रुत आहे. याचप्रमाणे सुनील तटकरेंना मदत करण्याबाबत शेकापचा मोठा गट नाराज आहे. याचाही परिणाम तटकरेंच्या मताधिक्यात पडू शकतो.गीतेंच्या विजयातील अडसरसलग सातव्यांदा लोकसभेवर जाण्याची संधी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासमोर असली तरी त्यांनाही गटबाजीला सामोरे जावे लागणार आहे. कुणबी व्होट बँकेच्या आधारावर गीते सातत्याने विजयी होतात, असे म्हटले जाते; परंतु आता या व्होट बँकेचेही वलय गीतेंच्या बाजूने दिसत नाही. गीते काही पायाभूत प्रकल्प आणतील आणि रोजगार उपलब्ध होतील, अशी अपेक्षा कुणबी समाजातील मतदारांची होती. शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यातील मतभेद उघड आहे. विधानसभेच्या दापोली मतदार संघातून रामदास कदमांचा मुलगा योगेश कदम इच्छुक आहे. आधी लोकसभा निवडणूक असल्याने कदमांना गीतेंसाठी प्रचारात पुढे राहावे लागेल, तरच गीते विधानसभेसाठी परतफेड करू शकतील, अशी परिसरात चर्चा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Anant Geeteअनंत गीतेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस