शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

लोकल धावणार :पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग दुहेरी, २१ नोव्हेंबरला चौक येथे सल्लामसलत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:39 IST

पनवेल - कर्जत रेल्वे मार्ग २००७च्या सुमारास सुरू झाला. मात्र, या मार्गावरून मालवाहतूक सुरू झाली. लोकल प्रवासी वाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त नाही

कर्जत : पनवेल - कर्जत रेल्वे मार्ग २००७च्या सुमारास सुरू झाला. मात्र, या मार्गावरून मालवाहतूक सुरू झाली. लोकल प्रवासी वाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त नाही, असे सांगण्यात आल्यावर प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला. त्यानंतर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या, परंतु कर्जतला काही गाड्यांचा थांबा नसल्याने असून अडचण अन् नसून खोळंबा अशी परिस्थिती प्रवाशांची झाली. मात्र, आता या मार्गाचे दुपदरीकरण होणार असून लोकल गाड्या धावतील असा लोहमार्ग तयार करण्यात येणार आहे. याकरिता महत्त्वपूर्ण सल्लामसलत बैठकीचे आयोजन मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने चौक रेल्वे स्थानकामध्ये २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने मुंबई शहर परिवहन प्रकल्प - ३ या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा खर्च रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन पन्नास - पन्नास टक्के प्रमाणात करणार आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य घेण्यात येणार असून प्रस्तावित पनवेल - कर्जत उपनगरीय ( लोकल ) रेल्वे मार्ग तयार झाल्यावर या मार्गावरून उपनगरीय सेवा म्हणजे लोकल सेवा सुरू करता येईल. या मार्गामुळे कर्जत ते मुंबई सीएसटीएम हे अंतर कमी होईल.प्रस्तावित रेल्वे प्रकल्पासाठी पर्यावरण व सामाजिक मूल्यमापन जागतिक बँकेच्या मार्गदर्शन व साहाय्याने करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा तपशील, मार्ग व प्रकल्पाचे फायदे तसेच पर्यावरण आणि सामाजिक परिणाम (भूसंपादन, प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या भौतिक विस्थापना, जीवनावश्यक प्रक्रि यांवर परिणाम) आणि उपशमन उपाय, पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा संबंधित जोखीम बदल थोडक्यात चर्चा करण्यासाठी सार्वजनिक सल्लामसलत बैठकीचे आयोजन मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चौक रेल्वे स्थानकावर करण्यात आलेआहे.सर्व संबंधित नागरिकांनी तसेच प्रकल्पग्रस्त व्यक्तींनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीने देण्यात आले आहे. प्रकल्पाबाबतची माहिती कॉर्पोरेशनच्या चर्चगेट स्टेशन बिल्डिंगमधील कार्यालयात तसेच ६६६.े१५ू.्रल्ल्िरंल्ल१ं्र’६ं८२.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाइटवर उपलब्ध आहे. प्रकल्पासंबंधित पर्यावरणीय आणि सामाजिक पैलूंमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक सल्लामसलत बैठकीत तोंडी किंवा लिखित स्वरूपात सूचना देऊ शकतात. तसेच अतिरिक्त माहिती किंवा शंका मुख्यप्रकल्प प्रबंधक - १, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मर्या. यांना ूस्रे१५ू’@ॅें्र’.ूङ्मे आणि ८िूस्रे’े१५ी@ॅें्र’.ूङ्मे या ई - मेलवर पाठवाव्यात असे त्यांनी प्रसिद्धिपत्रकात सूचित केले आहे.

टॅग्स :Karjatकर्जत