शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रयत्न आणि जिद्दीने के ली शेती

By admin | Updated: April 17, 2017 04:36 IST

नोकरीसाठी सोलापूरहून कर्जत तालुक्यात आलेल्या प्रगत शेतकऱ्याने स्थानिक होतकरू तरुणाला सोबत घेऊन शेतीतील वेगवेगळे प्रयोग केले आहे

संजय गायकवाड, कर्जतनोकरीसाठी सोलापूरहून कर्जत तालुक्यात आलेल्या प्रगत शेतकऱ्याने स्थानिक होतकरू तरुणाला सोबत घेऊन शेतीतील वेगवेगळे प्रयोग केले आहेत. भुईमूग आणि कांदा या पिकांची शेती आता फुलली असून, कडधान्य शेतीदेखील या दोन्ही शेतकऱ्यांनी यशस्वी करून अल्पभूधारक शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे.सोलापूर येथील हिंदूराव जाधव हे मुंबईमधील बेस्ट या परिवहन विभागात काम करीत असल्याने ते कर्जत तालुक्यात राहतात. नोकरीमुळे त्यांना आपला आवडता छंद जोपासता आला नाही. मात्र, डिकसळ येथील वैभव तुपे हे अल्पभूधारक असतानाही त्यांना सातत्याने प्रयोगशील शेती करण्याची आवड आहे. तुपे हे सातत्याने परिसरातील शेतकरी यांनी केलेली शेती यांची माहिती घेण्यासाठी ते फिरत असतात. जाधव यांची मागील दोन वर्षांपूर्वी तुपे यांच्याशी ओळख झाली. या दोघांनी डिकसळ येथील भातशेती शिवाय वेगळी शेती करण्याचा निर्णय घेतला. हिवाळ्यात वाल, हरभरा, मटकी आणि तूर या पिकाची शेती करताना त्यांनी आपल्या कुटुंबीयांना वर्षभर बनविता येईल, अशी कडधान्य साठवणूक करून ठेवता आली आहे. त्याच वेळी प्रामुख्याने घाट माथ्यावर केली जाणारी भुईमूग शेती करण्याचा निर्णय जाधव आणि तुपे या दोन प्रयोगशील शेतकऱ्यांनी घेतला. त्यासाठी भुईमूग शेतीला लागणाऱ्या भरपूर पाण्याची अडचण डिकसळ ग्रामस्थांनी पूर्ण केली. ग्रामस्थ पाणी वापरत नसलेली विहीर त्यांनी या दोन शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वापरण्यास दिली. भुईमूग शेती करण्यासाठी त्यांनी एक एकर जमिनीमध्ये वाफे तयार करून भुईमुगाचे वाण सोलापूर येथून आणले. २२ जानेवारी रोजी लावलेली भुईमुगाची शेती पूर्णपणे बहरली असून महिन्याभरात हे पीक जमिनीमधून काढले जाणार आहे. भुईमुगाशिवाय या दोघा शेतकऱ्यांनी कांदा पीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. भुईमुगाच्या वाढलेल्या झाडाला जमिनीत लागलेल्या शेंगा लक्षात घेता मे २०१७ रोजी आम्हाला ८०० किलो शेंगा मिळतील, असा विश्वास त्यांना आहे. तसेच शेतातील कांद्याचे पीक चांगले असल्याचे समाधान व्यक्त के ले. या दोन्ही प्रकारची शेती करण्यासाठी हिंदूराव जाधव आणि वैभव तुपे यांना ११ हजार खर्च हा बियाणे, खते, कीटकनाशक, डिझेल पंप यांच्यासाठी आला आहे. त्याचवेळी या दोघांनी आपल्या शेतात ज्वारी, बाजरी, भाजीपाला पिके केली असून आपल्या शेतीतील यशस्वी प्रयत्नाबद्दल ते दोघे समाधानी आहेत. परिसरातील प्रयोगशील शेती पाहण्यासाठी शेतकरी भेट देत असून त्यांना सर्व प्रकारची माहिती देण्याचे काम वैभव तुपे करीत आहेत.