शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परवान्याअभावी हातपाटी ठप्प

By admin | Updated: August 24, 2015 02:37 IST

राज्य शासनाने पर्यावरण रक्षणाचे जतन करून नदी, खाड्यांमधील डुबी हातपाटीद्वारे रेती उत्खनन करणाऱ्या पारंपरिक रेती व्यावसायिकांना परवाने

पेण : राज्य शासनाने पर्यावरण रक्षणाचे जतन करून नदी, खाड्यांमधील डुबी हातपाटीद्वारे रेती उत्खनन करणाऱ्या पारंपरिक रेती व्यावसायिकांना परवाने देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. संबंधित पारंपरिक हातपाटी डुबी रेती व्यावसायिकांनी याबाबतीचे अर्ज महसूल विभागाकडे भरून देखील या हातपाटी व्यावसायिकांची रॉयल्टी व संबंधित परवाने महसूल यंत्रणेने न दिल्याने हातपाटी रेती व्यवसाय ठप्प झाला आहे.सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बाजारात रेतीअभावी बांधकामे ठप्प झाली असून याचा फटका मजूर, नाका कामगार व हातपाटी रेती व्यावसायिकांना बसत असून आर्थिक समस्येचा सामना त्यांना करावा लागत आहे. या व्यवसायावर अनेकांचा उदरनिर्वाह होत असून शासनाने हातपाटी डुबी रेती व्यवसायिकांना तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी रावे गावचे समाजसेवी कार्यकर्ते गुलाबचंद पाटील यांनी केली आहे.पेण तालुक्यातील दादर-रावे या खाडीकिनारी गावांमध्ये २०० ते २५० डुबी हातपाटी रेती व्यावसायिक असून पूर्वापार हातपाटीद्वारे रेती व्यवसाय करीत आहेत. गेले वर्षभर शासनाने रेती व्यवसायावर बंदी घातल्याने २००० ते २५०० कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. कामगारांना प्रतीक्षा कामाची : रेती व्यावसायिकांनी महसूल यंत्रणेकडे परवानगीबाबत अर्ज भरून देखील उत्खनन परवानगी व रॉयल्टी कर रक्कम भरून न घेतल्याने ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांधकामला रेती न मिळाल्याने हा व्यवसाय करणारे परवान्याअभावी रेती उत्खनन करू शकत नाहीत. यामुळे बांधकाम मजूर, नाका कामगार यांचा रोजगार बंद झाला आहे. पेणमध्ये २००० ते २५०० कामगार नाक्यावर मजुरीच्या प्रतीक्षेत उभे असतात. दासगाव : महिनाभरापूर्वी शासनाकडून वाळू व्यवसायाला रीतसर परवानगी मिळाली, परंतु या परवानगीनंतर हातपाटी व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने नियमात अनेक अडचणी आणल्यामुळे हा व्यवसाय अद्याप सुरू झाला नाही. मेरीटाइम बोर्डाची परवानगी, पर्यावरण खात्याची परवानगी व इतर अनेक छोट्या-मोठ्या परवानग्या असल्याने परवानग्या घेऊन देखील हा व्यवसाय सुरू होऊ शकला नाही. कारण या सर्व परवानग्या मिळून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा होऊन रीतसर पैसे भरत रॉयल्टी मिळणे गरजेचे आहे. शासनाने पुन्हा वाळूचोरीवर लगाम लावण्यासाठी स्मार्ट प्रणाली आॅनलाइन एंट्री कायद्याला सुरुवात केल्यामुळे वाळू व्यावसायिकांना याचे प्रशिक्षण दिल्याशिवाय उत्खननाला परवानगी देण्यात येणार नाही. यामुळे हातपाटी व्यवसाय करणाऱ्या या मजुरांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे.(वार्ताहर)