शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मोऱ्या देताहेत अपघातांना निमंत्रण

By admin | Updated: August 3, 2015 03:53 IST

मुंबई - गोवा महामार्गाचे २०१२-१३ मध्ये रुंदीकरण तसेच मोऱ्यांच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग यांच्यामार्फत पोलादपूर ते

दासगाव : मुंबई - गोवा महामार्गाचे २०१२-१३ मध्ये रुंदीकरण तसेच मोऱ्यांच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग यांच्यामार्फत पोलादपूर ते माणगाव दरम्यान करण्यात आले. या कामात अंदाजे १५० हून अधिक मोऱ्यांचे रुंदीकरण झाले. मात्र साइडपट्ट्यांअभावी हे रुंदीकरण दुचाकी वाहनांना जीवघेणे ठरले आहे.पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात २९ मोऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. महाड तालुक्यात सर्वाधिक १०४ मोऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. तर उर्वरित मोऱ्याचे बांधकाम माणगाव तालुक्यात करण्यात आले. यापूर्वीच्या दुपदरी मुंबई - गोवा राष्ट्रीय मार्गाच्या मोजमापानुसार बांधण्यात आलेल्या या मोऱ्या काहीशा अरुंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाढवण्यासाठी २०१२-१३ मध्ये मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विशेष कार्यक्रम हाती घेतला. तत्पूर्वी साइडपट्ट्यांचे मजबुतीकरण करून त्यावर डांबरीकरण केल्याने दुपदरी रस्ता हा तीन पदरी झाला आहे. यामुळे मोऱ्यांच्या रुंदीकरणाची आवश्यकता दिसून आली होती. या रुंदीकरणादरम्यान साइडपट्टी शिल्लक न राहिल्याने रस्त्याच्या दुतर्फा माती भराव करण्यात आला, मात्र हा भराव गेल्या दोन पावसाळ्यात पाण्याने खचून साइडपट्टी रस्त्यापासून अर्धा ते एक फूट खाली गेली आहे. परिणामी रुंदीकरण झालेल्या मोऱ्यांचे बांधकाम हे रस्त्याच्या पातळीला समान आहे तर साइडपट्टीवर उतरलेली वाहने या मोऱ्यांच्या काँक्रीट बांधकामावर धडकून अपघात होत आहेत.पोलादपूरच्या कशेडी घाटापासून ते माणगावपर्यंत गेल्या दोन ते तीन वर्षांत मोऱ्यांना आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या मधोमध राहून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत. वाहतूक पोलीस महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी येत्या गणेशोत्सवापूर्वी मोऱ्यांच्या बांधकामावर दगड, मातीचे भराव करण्याची आवश्यकता आहे. तर मोऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या साइडपट्ट्यांवर देखील भराव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे न केल्यास येत्या गणेशोत्सवामध्ये कोकणामध्ये जाणाऱ्या वाहनांना याचा फटका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (वार्ताहर)