शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीत डोणवत धरण ओव्हरफ्लो

By admin | Updated: July 30, 2015 00:14 IST

पावसाने पुन्हा जोर धरल्याने खोपोली परिसरातील डोणवत धरण ओव्हरफ्लो झाले आहे. येथील झेनिथ धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण असला तरी अपघात टाळण्यासाठी

खालापूर : पावसाने पुन्हा जोर धरल्याने खोपोली परिसरातील डोणवत धरण ओव्हरफ्लो झाले आहे. येथील झेनिथ धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण असला तरी अपघात टाळण्यासाठी याठिकाणी जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला जात आहे. त्यामुळे डोणवत धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. खोपोली परिसरात अनेक लहान मोठे धबधबे असून मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, नवी मुंबई येथील पर्यटक याठिकाणी वर्षा सहलीसाठी येतात. शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी हा परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातो. खोपोलीत येणारी रेल्वे तर प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेली असते. झेनिथला पर्यटकांची पहिली पसंती असली तरी या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही उपाय नाहीत. याठिकाणी असलेले डोणवतचे धरण व आडोशीचा निसर्गरम्य धबधबा सध्या ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे याठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. तांबाटी गावातील या धरणावर पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांचा आणखी ओघ याठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)डोणवत धरण परिसरात पर्यटकांनी फार आत जाऊ नये. पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी ग्रामपंचायत सकारात्मक विचार करीत आहे. शासनाने पर्यटन निधीअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करु न दिल्यास एक चांगले पर्यटनस्थळ निर्माण होऊ शकते.-संदेश पाटील,उपसरपंच, तांबाठीडोणवतचे धरण खोपोली-पेण रस्त्यावर खोपोलीपासून १२ कि.मी. अंतरावर आहे. तर आडोशीचा धबधबा ६ कि.मी. अंतरावर आहे. पर्यटकांच्या दृष्टीने सोयीचे, सुरक्षित व रस्त्यापासून जवळचे ठिकाण म्हणून डोणवत धरणाला पसंती मिळत आहे.