शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 23:53 IST

अंधश्रद्धेमुळे फासला शेंदूर : पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर!

मधुकर ठाकूर।

उरण : उरण तालुक्यात चिरनेर, कळंबुसरे, आवरे आदी परिसरांत अनेक वर्षांपूर्वी सापडलेले अति पुरातनकालीन पाषाणातील दुर्मीळ शिलालेख आढळून आले आहेत. ऐतिहासिक नोंदीत ‘गधेगळ’ नावाने ओळखले जाणारे शिल्प, शिलालेख जतन करण्याची आवश्यकता असताना, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेले आहेत, तर अंधश्रद्धेमुळे देवी-देवतांच्या नावाने शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

चिरनेर येथील शिवमंदिराच्या उभारणीच्या कामासाठी उत्खनन सुरू होते. या उत्खननात शिलालेख सापडले होते. चिरनेर येथे काही वर्षांपूर्वी सापडलेल्या दोन शिलालेखांपैकी एक शिलालेख शंकर मंदिराच्या तळ्याकाठी धूळखात अस्तित्वहिन अवस्थेत पडून आहे, तर दुुसरा शिलालेख चिरनेर येथीलच भैरवनाथ मंदिराच्या परिसरात शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती येथील रहिवासी जीवन केणी यांनी दिली, तसेच असेच ऐतिहासिक शिलालेख कळंबुसरे येथील गावात तीन, तर आवरे गावात दोन ठिकाणी आढळून आले आहेत. यापैकी काही शिलालेख शेतीच्या बांधावर, घर, मंदिर तर काही शिलालेख मंदिर परिसरात सापडले आहेत.

शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत, तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करतात.मध्ययुगीन भाषिक इतिहासावरही प्रकाश टाकता येतो. अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्व समजून घेणं अपेक्षित असताना मात्र, ऐतिहासिक ठेवा पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडलेल्या अवस्थेत आढळून येत आहे.यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला तो अस्सल पुरावाउपेक्षित ठेवण्याऐवजी जतनकरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.१० ते १६व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधाचा निष्कर्ष‘गधेगळ’ म्हणून ओळखला जाणारा प्रत्येक शिलालेख आणि शिल्प तीन टप्प्यांत विभागली गेली आहेत. वरच्या टप्प्यात चंद्र, सूर्य आणि कलश यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मधल्या टप्प्यात काही मजकूर कोरलेले दिसतात, तर खालच्या टप्प्यात एक गाढव महिलेवर आरूढ असल्याची कोरीव प्रतिमा दिसत आहे. अशी प्रतिमा आणि आलेख असल्यानेच या शिलालेखाला ‘गधेगळ’ नाव पडले असल्याचे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे. ते १० ते १६व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधित असल्याचा निष्कर्षही इतिहास संशोधकांनी काढला आहे.

टॅग्स :Raigadरायगड