शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

भरतीमध्ये आदिवासी उमेदवारावर अन्याय

By admin | Updated: December 27, 2016 02:38 IST

सुधागड तालुक्यातील अनुदानित पडसरे व चिवे येथील आश्रमशाळेच्या भरती प्रक्रि येत बोगस गुणांकन करून आदिवासी समाजाच्या पात्र उमेदवाराला डावलून भरती केल्याचा आरोप

पाली : सुधागड तालुक्यातील अनुदानित पडसरे व चिवे येथील आश्रमशाळेच्या भरती प्रक्रि येत बोगस गुणांकन करून आदिवासी समाजाच्या पात्र उमेदवाराला डावलून भरती केल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थी कृती समितीचे राज्य अध्यक्ष सुनील टोटवळ यांनी केला आहे.आदिवासी विभाग अप्पर आयुक्त ठाणे व आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी पेण यांना याबाबत निवेदन दिले आहे.कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली सुधागड या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या पडसरे व चिवे आश्रमशाळेतील रिक्त असलेल्या वर्ग ४ पदाकरिता २० सप्टेंबर २०१६ रोजी मुलाखती व लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या आदिवासी समाजातील मारुती लहू डोके याच्यावर अन्याय झाला असल्याचे टोटवळ यांचे म्हणणे आहे. ही भरती प्रक्रि या रद्द करून ती नव्याने घेण्यात यावी तसेच या भरती प्रक्रि येची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी के ली आहे.जोपर्यंत डोके यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कायदेशीर मार्गाने हा लढा आम्ही असाच सुरु ठेवणार व वेळ पडल्यास डोके याच्याबरोबर आम्ही उपोषणाचे हत्यार देखील उपसू आसा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)सुधागड तालुक्यातील अनुदानित पडसरे व चिवे येथील आश्रमशाळेतील भरती प्रक्रिया पूर्णपणे नियमात व पारदर्शक झाली आहे. या भरतीत अनुसूचित जमाती संवर्गासाठी जागा नव्हत्या. खुल्या प्रवर्गासाठी जागा होत्या. या भरती प्रक्रि येसाठी आदिवासी प्रकल्प विभाग व समाज कल्याण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या भरती प्रक्रि येबाबत कोणत्याही चौकशीला आम्ही सामोरे जाऊ. - रवींद्र लिमये, संचालक, अनुदानित आश्रमशाळा पडसरे व चिवे