शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

मोतीबिंदूच्या रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 6:52 AM

जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांच्या आॅपरेशनसाठी ‘स्मार्ट ओटी’ उभारण्यात येत आहे. मात्र स्मार्ट ओटीचे काम संथगतीने सुरु असल्याने नियमितपणे होणाऱ्या मोतीबिंदूच्या आॅपरेशनला ब्रेक लागला आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग  - जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांच्या आॅपरेशनसाठी ‘स्मार्ट ओटी’ उभारण्यात येत आहे. मात्र स्मार्ट ओटीचे काम संथगतीने सुरु असल्याने नियमितपणे होणाऱ्या मोतीबिंदूच्या आॅपरेशनला ब्रेक लागला आहे. मोतीबिंदूचे आॅपरेशन करणाºयांच्या प्रतीक्षा यादीने सुमारे १७२ चा आकडा पार केल्याचे बोलले जात आहे.रुग्णांना अत्याधुनिक सुविधा देण्याचा जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाचा निर्णय स्तुत्य असला तरी, मोतीबिंदूच्या आॅपरेशनची पर्यायी व्यवस्था माणगाव येथील सरकारी रुग्णालयात करण्यात आल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे. लवकरात लवकर स्मार्ट ओटीचे काम पूर्ण करुन रुग्णांच्या डोळ््यापुढील अंधकार दूर करावा, अशी मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे.रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे. याच ठिकाणी महत्त्वाची सर्वच सरकारी कार्यालये, जिल्हा न्यायालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पोस्ट आॅफिस, जिल्हा परिषद यासह अन्य कार्यालयेही अलिबागलाच आहेत. त्याचप्रमाणे अलिबाग येथे जिल्हा सरकारी रुग्णालयही कार्यरत आहे. जिल्ह्याच्या कानाकोपºयातून गोर-गरीब रुग्ण मोठ्या संख्येने अलिबागच्या सरकारी रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येत असतात. जिल्हा सरकारी रुग्णालयामध्येच डोळ््यांचा विभागही आहे. डोळ््यांची समस्या असलेले रुग्ण येथे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामध्ये बहुसंख्येने मोतीबिंदूच्या आॅपरेशनसाठी आलेले असतात. नेत्र विभागात तज्ज्ञ डॉक्टर आहेत, परंतु रुग्णांना आवश्यक असणारे सुसज्ज असे अत्याधुनिक आॅपरेशन थिएटर नव्हते. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी डोळ््यांच्या विभागासाठी स्वतंत्र एक स्मार्ट ओटी असावी यासाठी अलिबाग सरकारी रुग्णालयाच्या परिसरातच ती उभारण्याचे ठरले. त्यानुसार कामही सुरु झाले. परंतु काम संथगतीने सुरु असल्याने मोतीबिंदूचे आॅपरेशन होत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. काम सुरु करुन किमान तीन महिन्यांचा कालावधी होत आला आहे. त्यामुळे मोतीबिंदूचे आॅपरेशन करणाºयांची वेटिंग लिस्ट १७२ वर पोचली आहे. ओटीचे काम कधी होईल आणि आपले आॅपरेशन एकदाचे कधी पार पडेल याच विंवचनेत रुग्ण आहेत.नेत्र विभागाचे काम सुरु आहे. याची माहितीही रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन दिली जात नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये नाराजीचा सूर आहे.संसर्ग टाळण्यासाठी अद्ययावत यंत्रणानेत्र विभागामध्ये कोणतीच धूळ, अस्वच्छता नसणे गरजेचे असते. डोळ््याचे आॅपरेशन हे खूप सेंसिटीव्ह असते. आॅपरेशननंतर रुग्णांना संसर्ग होऊ न देणे तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु नेत्र विभागात असलेली ओटी खूपच जुनी झाली होती. तसेच आॅपेरशननंतर संसर्ग होण्याचा धोका वाढला होता. त्यामुळे स्मार्ट ओटी बांधणे गरजेचे होेते. स्मार्ट ओटीही आंतरराष्ट्रीय मानांकनावर आधारित आहे. त्यामुळे रुग्णांना आता थोडा त्रास झाला असेल, परंतु हे त्यांच्याच सुरक्षित सुविधेसाठी केले जात असल्याचेही डॉ. प्रीती प्रधान यांनी स्पष्ट केले.दरवर्षी सुमारे एक हजार डोळ््यांचे आॅपरेशन केले जातात. स्मार्ट ओटीचे काम सुरु असल्याने सध्या ती बंद आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी माणगावच्या सरकारी रुग्णालयात तातडीची आॅपरेशन करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ. प्रीती प्रधान यांनी सांगितले. मात्र याठिकाणी जाणे काही रुग्णांसाठी गैरसोयीचे आहे.आयडीएल सिझननेच स्मार्ट ओटीउन्हाळ््याच्या कालावधीत विशेष करुन रुग्ण आॅपरेशनला पसंती देत नाहीत. या कालावधीत उष्णता खूप असते तसेच शेतकरी, मच्छीमार हे या कालावधीत त्यांच्या कामामध्ये गुंतलेले असतात. आयडीएल सिझननुसारच स्मार्ट ओटीचे काम हाती घेण्यात आले आहे असे नेत्र विभागाच्या डॉक्टर प्रीती प्रधान यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ओटीचे काम पूर्ण झाल्यावर संपूर्ण निर्जंतुकीकरण केले जाईल.त्यानंतरच ओटीचा वापर करता येईल आणि यासाठी अजून एक महिना लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.स्मार्ट ओटी म्हणजे काय?स्मार्ट ओटीलाच मॉड्युलर ओटी असे बोलले जाते. या ओटीमध्ये संपूर्ण स्टील पॅनल बसवलेले असतात. मॉड्युलर फ्लोरिंग, भिंती त्याचप्रमाणे ओटीमध्ये हवा आत येताना तेथे बसवण्यात आलेल्या एअर प्युरीफायिंग सिस्टीममधूनच येते. प्रदूषित हवेला रोखण्यात येते. या ओटीतील लाइटची व्यवस्थाही अत्याधुनिक असते.

टॅग्स :Healthआरोग्यRaigadरायगड