शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

वीज खांबावर दिवे नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:40 AM

एकदरा, डोंगरी, राजपुरी गावातील ग्रामस्थांना संध्याकाळच्या दरम्यान मुरूड शहरात जावयाचे असल्यास त्या वेळी रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. अशा वेळी असंख्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

आगरदांडा : मुरूडपासून हाकेच्या अंतरावर असणारे एकदरा, डोंगरी व राजपुरी या रस्त्यावर असणाऱ्या विद्युत खांबावर स्ट्रीट लाइट नसल्यामुळे येथील ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतीने वीजपुरवठा करणे क्रमप्राप्त असतानादेखील रस्त्यालगत विजेची सुविधा नसल्याने ग्रामस्थांना रात्री चाचपडत रस्ता शोधावा लागत आहे. राजपुरी व एकदरा ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीमधील रस्त्यावरील दिवे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

एकदरा, डोंगरी, राजपुरी गावातील ग्रामस्थांना संध्याकाळच्या दरम्यान मुरूड शहरात जावयाचे असल्यास त्या वेळी रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. अशा वेळी असंख्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील दिवे लावण्याचे कामसुद्धा ग्रामपंचायतचे असताना दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन रस्त्यावरील दिवे तातडीने लावण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पर्यटकांना त्रासवेलकम सोसायटीचे चेअरमन जावेद कारभारी यांनी सांगितले की, जंजिरा किल्ला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. जंजिरा किल्ल्यावर जाणारा मार्ग हा राजपुरी व एकदरा ग्रामपंचायतींमधून जात आहे. असे काही प्रसंग घडलेले आहेत की ज्या वेळी पर्यटकांच्या गाडीची लाइट व्यवस्था बिघडून त्यांना याच रस्त्यावर अंधारात राहावे लागले आहे. जर का रस्त्यावरील वीज दिवे असतील तर पर्यटकांप्रमाणे स्थानिक ग्रामस्थांनासुद्धा याचा फायदा होणार आहे.