शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

'अजितदादांनी पक्षातील लोकशाही समोर आणली तेव्हा....', धनंजय मुंडेंनी पवार गटावर केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 17:06 IST

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाच्या वैचारिक मंथन शिबीराला सुरुवाात झाली आहे.

रायगड- आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार यांच्या गटाच्या वैचारिक मंथन शिबीराला सुरुवाात झाली आहे, या शिबीरासाठी राज्यभरातून नेते उपस्थित आहेत. दरम्यान, सुरुवातीला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात अजितदादांच्या नेतृत्वात नंबर एकचा पक्ष करुया असं आवाहन केलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी मित्र कोण... शत्रू कोण हे गणित कळले नाही... ही कविता बोलत अजितदादा पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, काही लोकांकडून लोकशाही टिकली पाहिजे असे सांगितले जायचे मग ती पक्षातील असो, राज्यातील मात्र जेव्हा पक्षातील लोकशाही अजितदादा पवार यांनी समोर आणली, त्यावेळी दादांना खलनायक ठरवण्यात आले, असं सांगत धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. 

देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

"प्रत्येक भूमिका घेतल्या त्यावेळी खलनायक कोण तर अजितदादा ठरले . स्वतः च्या नेतृत्वासाठी अनेक निर्णय घेतले. त्यावेळी अजितदादा चांगले होते परंतु पक्षातील लोकशाही टिकवण्यासाठी निर्णय घेतला तर ते खलनायक झाले आणि आज कोणपण टिका करत आहेत, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी यावेळी लगावला. 'काहींना दादांची जागा मिळवल्याचा भास होतो आहे, कर्जत - जामखेड उमेदवारी घेण्यासाठी काहीजण भाजपकडून फिल्डिंग लावत होते. त्यांनी आमच्यावर टिका करावी, अशी टीकागही मुंडे यांनी केली.

"दादांचे योगदान कुणी विसरु शकत नाही" "अजितदादांची महाराष्ट्राला गरज आहे. दादा तुम्ही केलेले काम महाराष्ट्राला सांगितले नाही. मात्र अजितदादा यांनी परळी विधानसभा मला दिली नसती तर परळी विधानसभा राष्ट्रवादीकडे आला नसता म्हणून दादांचे योगदान कुणी विसरु शकत नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले. दादांच्या समोर महाराष्ट्राचा विकास आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. आपल्याकडे कोहिनूर हिरा असताना आपण बॅकफूट जायचे नाही तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतील शिबीरातून फ्रंटफूटवर येऊन काम करायचे आहे, अशा विश्वासही मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस