शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर्सवरील तक्रारीत वाढ

By admin | Updated: September 2, 2015 03:50 IST

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत असतानाच तेथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून विविध बिल्डर्सनी घरबांधणीचे

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत असतानाच तेथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून विविध बिल्डर्सनी घरबांधणीचे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहेत. बिल्डर्सकडून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढत आहे. ग्राहकांच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या बिल्डर्सविरोधात जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रारींचे प्रमाण सुमारे ६० टक्के असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प प्रस्तावित असून पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग हे तालुके सध्या विकासाच्या वाटेवर आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल आणि उरण तालुक्यामध्ये नागरीकरण वाढत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने विविध बिल्डर्सनी गृहप्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. मोठमोठे होर्डिंग्ज, फसव्या जाहिरातीच्या माध्यमातून हे बिल्डर्स ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. ग्राहकांकडून कोट्यवधी रुपयांचे बुकिंग घेऊन काही बिल्डर्सनी पळ काढला आहे, तर काहींनी कामेच अर्धवट करुन ग्राहकांना वेठीस धरल्याच्या घटना घडल्या आहेत. स्वप्नांची पूर्तता होताना दिसत नसल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. सातत्याने ते बिल्डर्सच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित असून बिल्डर्स त्यांना थारा देत नसल्याचे वेळोवेळी समोर येत आहे.