शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शासन, जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक

By admin | Updated: August 6, 2015 03:02 IST

धरमतर खाडीकिनारी व धरमतर ब्रिजजवळील सर्वे नं. ११७ ते १२३ या डोलवी पट्ट्यातील १८ शेतकऱ्यांच्या जमिनींवर महाराष्ट्र शासनाच्या नावाची सातबारा नोंद आहे

पेण : धरमतर खाडीकिनारी व धरमतर ब्रिजजवळील सर्वे नं. ११७ ते १२३ या डोलवी पट्ट्यातील १८ शेतकऱ्यांच्या जमिनींवर महाराष्ट्र शासनाच्या नावाची सातबारा नोंद आहे, तर कुळ म्हणून संबंधित शेतकऱ्यांची नावे आहेत. या शेतजमिनीवर जेएसडब्ल्यू कंपनीच्या कन्व्हेअर बेल्ट टप्पा क्र. २ चे बांधकाम सुरू झाल्याने कुळसदरी नोंद असलेले शेतकरी मंगळवारी जेएसडब्ल्यू कंपनी व्यवस्थापनासाठी आमच्या शेतजमिनीत भराव करू नका, याबाबत बैठकीस बसले होते. संबंधित जागा राज्य शासनाची असून याबाबतची परवानगी कंपनीने घेतली आहे. त्यामुळे शेतकरी शासन व कंपनी व्यवस्थापनाशी आंदोलनाच्या मार्गातून लढा देणार असल्याचे शेतकरी गटाचे प्रमुख लीलाधर पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शासन, जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात शेतकरी उपोषण करण्याच्या पवित्र्यात आहेत. धरमतर ब्रिज व खाडीकिनारची ३२ एकर जागेवर महाराष्ट्र शासन अशी सातबारा उताऱ्यांवर नोंद आहे व त्यावर कुळ म्हणून डोलवी गावातील १८ शेतकऱ्यांची नोंद आहे. सर्व्हे नंबर ११७,११८,१२१,१२२,१२३ कुळ म्हणून मूळ शेतकऱ्यांच्या वारसाचा हा लढा गेली तीन वर्षे महसूल यंत्रणा, जिल्हाधिकारी रायगड, कोकण आयुक्त व जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. शेतजमिनीत एकदा भराव केल्यानंतर त्या जमिनी वापरायोग्य राहणार नाही, असे सांगून नाराज झालेले शेतकरी बैठकीतून निघून केले. (वार्ताहर)