शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: September 3, 2015 02:56 IST

पडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा मार्ग सिडकोने मंगळवारी मोकळा करून दिला आहे

कळंबोली : पडघे येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा मार्ग सिडकोने मंगळवारी मोकळा करून दिला आहे. आदिवासी विभागाला कळंबोली येथे देण्यात आलेल्या भूखंडावरील अतिक्र मणे अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. येत्या दोन दिवसात सोपस्कार करून ही जागा आदिवासी विकास प्रकल्पाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक मुलाला कमीत कमी ४० फूट जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यानुसार पडघे येथील आदिवासी वसतिगृहाकरिता कमीत कमी २० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची आवश्यकता आहे. इतकी मुबलक जागा पनवेल किंवा आजूबाजूला भाडेतत्त्वावर मिळत नाही. त्याचबरोबर मुबलक शौचालय, चोवीस तास पाणी व इतर सुविधा मिळणे आवश्यक आहे. यासारख्या असंख्य अडचणी येतात, यावर पर्याय म्हणून आदिवासी प्रकल्प कार्यालयाने या वसतिगृहाकरिता हक्काची जागा असावी याकरिता सिडकोकडे २०११ साली प्रस्ताव सादर केला होता. त्याकरिता त्या त्या गृहपालांनी सिडकोच्या समाजसेवा, भूमापन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रस्तावित जागा सिडकोने आदिवासी विकास विभागाकडे हस्तांतरित केली नव्हती.पनवेल-सायन महामार्गालगत कातकरवाडीच्या बाजूला सेक्टर-१ ई मध्ये भूखंड क्र मांक-१२ हा साडेसतरा गुंठ्याचा भूखंड सिडकोने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकरिता मंजूर केला आहे. याकरिता नियमानुसार आदिवासी विकास विभागाकडून रक्कम मार्च २०१४ मध्ये अदा केली होती. त्यानंतर ताबा देण्याची वेळ आली असता त्या ठिकाणी अतिक्र मण असल्याचे उघड झाले. पूर्वी त्यामुळे हा भूखंड ताब्यात घेण्यात आला नाही. या आदिवासी वसतिगृहाला पर्यायी जागा मिळत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून वादंग सुरू आहे. प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याकरिता या जागेवर इमारती बांधणे या विभागाला क्र मप्राप्त झाले आहे. त्यानुसार सिडकोनेही ताबा देवू केला असून लवकरच येथे नवीन इमारतीचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. (वार्ताहर)