शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

चौपदरीकरणाचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 6:19 AM

दुसर्‍या टप्प्यातील मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या  कामाला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी सकाळी माणगाव तालुका हद्दीतील  वडपाले लाखपाले, टेम्पाले आणि खांडपाले या चार गावांमध्ये महामार्ग चौ पदरीकरणाचे काम प्रारंभ करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि  चौपदरीकरण ठेकेदार कंपनी चेतक इंटरप्रायझेसचे अधिकारी आणि कामगार  पाले गाव हद्दीत यंत्रणा घेऊन उतरले असता, जोरदार विरोध करत ग्रामस्थांनी  काम थांबवले.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग पैसे दिल्याशिवाय काम सुरू करू न देण्याचा बाधि तांचा निर्धार

सिकंदर अनवारे । लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : दुसर्‍या टप्प्यातील मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या  कामाला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी सकाळी माणगाव तालुका हद्दीतील  वडपाले लाखपाले, टेम्पाले आणि खांडपाले या चार गावांमध्ये महामार्ग चौ पदरीकरणाचे काम प्रारंभ करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि  चौपदरीकरण ठेकेदार कंपनी चेतक इंटरप्रायझेसचे अधिकारी आणि कामगार  पाले गाव हद्दीत यंत्रणा घेऊन उतरले असता, जोरदार विरोध करत ग्रामस्थांनी  काम थांबवले. विविध आरोप-प्रत्यारोपांसोबत महसूल विभागाच्या तलाठय़ा पासून प्रांताधिकार्‍यांपर्यंत आणि शिपायापासून कर्मचार्‍यांपर्यंत टक्केवारी  मागितल्याचा आरोप पाले ग्रामस्थांनी केला. महामार्ग विभागाचे अधिकारी  प्रकाश गायकवाड यांनी एक बैठक आयोजित करत ग्रामस्थांची समज काढत  वातावरण शांत केले असले तरी माणगाव महसूल विभागाच्या विरोधात प्रचंड  संताप व्यक्त होत आहे. इंदापूर ते पोलादपूर अशा मुंबई -गोवा महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्यातील काम  गेल्या महिनाभरापासून सुरू झाले आहे. महाड तालुक्यात महामार्गाच्या चौ पदरीकरणाच्या कामाला कोणतीही हरकत आली नसून, ठेकेदार कंपनी ट प्प्याटप्प्याने चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ करत आहे. मात्र, मंगळवारी  महाड तालुका हद्दीला जोडूनच असलेल्या माणगाव तालुका हद्दीतील लाखा पाले, वडपाले, टेम्पाले, खांडापाले या चार गावांतील ग्रामस्थांनी महामार्ग चौ पदरीकरणाच्या कामावर आक्षेप घेत काम बंद पाडले आहे. ताब्यात घेतल्या  जाणार्‍या जागेची जेसीबीच्या माध्यमातून चर खोदून सीमारेषा निश्‍चित होणार  होती. महामार्ग विभागाचे उपअभियंता गायकवाड, चेतक इन्टरप्रायझेस आ पल्या अधिकारी कर्मचारी आणि मशिनरीसह महामार्गावर उतरल्यानंतर पाले  गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या कामाला जोरदार विरोध केला.ताबा घेण्यात येत असलेल्या जागेवर सुमारे अर्धा तास चर्चा आरोप, प्रत्यारोप  झाल्यानंतर उपअभियंता गायकवाड यांनी सामंजस्याची भूमिका घेत  बैठकीला बसण्याचा निर्णय घेतला. लाखपाले ग्रा. पं. कार्यालयामध्ये उ पअभियंतामध्ये बैठक झाली.  या सभेदरम्यान सात-बारावरती सदोष नोंदणी  त्याचा ग्रामस्थांना बसलेला भुर्दंड महसूल विभागाच्या तलाठय़ामार्फत सात- बारातील बदल आणि सुधारण्यासाठी पैसे मागणे तसेच फाइल पुढे  पाठविण्यासाठी प्रांत कार्यालयातील शिपाई आणि कर्मचारी यांचेकडून  पैशांची मागणी आणि लाभार्थीचे पैसे खात्यात जमा करण्यासाठी स्वत: प्रां ताधिकार्‍यांकडून टक्केवारीची मागणी असे गंभीर आरोप ग्रामस्थांनी केले. प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांची नावे त्यांची तक्रार अगर समस्या आणि संपर्कासाठी  नंबर अशी माहिती संकलित करून ती वरिष्ठांकडे पुढे मांडण्याचा निर्णय  महामार्गाचे महामार्गाचे प्रकाश गायकवाड यांनी घेतला. शंभर टक्के प्रकल्पग्रस् तांचे शंभर टक्के पैसे अदा झाल्याशिवाय चार गावांतील ग्रामस्थ महामार्गाच्या  या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू करू देणार नाही, अशी रोखठोक  भूमिका या वेळी पाले ग्रामस्थांनी मांडली. 

परदेशातील नागरिकांचा खोळंबापाले गावातील मोहल्ल्यातील बहुसंख्य ग्रामस्थ व्यवसायाच्या कारणाने  परदेशामध्ये वास्तव्याला आहेत. महामार्गबाधित होणार्‍या जागेचे पैसे  मिळण्याच्या सुनावणीची तारीख जाहीर झाल्याने अनेक चाकरमान्यांनी ला खो रुपयांची पदरमोड करत गाव गाठले. १५ ते २0 दिवस शासन दरबारी  चकरा मारूनदेखील पैसे मिळण्यासाठीचा कागदोपत्री तिढा न सुटल्याने या  ग्रामस्थांना हात हालवत पुन्हा परदेशात जावे लागले. महामार्गाचे पैसे मिळाले  नाहीत. येण्या-जाण्याच्या तिकिटावर लाखोंचा खर्च झाला. शासकीय  कार्यालयात फेर्‍या आणि कागदपत्रे जमवाजमवीचा मनस्ताप सहन करावा  लागला आहे.

नोंदी वगळल्यामहामार्गासाठी बाधित होणार्‍या जमिनींच्या सात-बारांना नोटिसा बजावल्या  जात असताना अनेक सात-बाराधारकांना नोटिसा बजावल्या गेल्या नाहीत.  नकाशाप्रमाणे सात-बाराधारकांची जागा बाधित होत आहे. मात्र, नोटिस नाही  अशी वस्तुस्थिती ग्रामस्थांनी दाखवून दिली. सुरुवातीपासूनची सर्व प्रक्रिया  पूर्ण करावी लागणार असून, यामध्ये पुन्हा वेळ वाया जाणार आहे. ७/१२च्या नोंदीप्रमाणे ग्रामस्थांमार्फत मयताच्या नोंदी रद्द करणे, नवीन नाव  वाढवणे, अगर नावामध्ये दुरुस्ती करणे यामुळेदेखील अनेक कागदोपत्री  अडचणी निर्माण झाल्या आहेत. चौपदरीकरणाचे पैसे वाटप असताना आ िर्थक गैरव्यवहार करून प्रांत कार्यालयामार्फत पैसे वाटप झाल्याचा आरोप  ग्रामस्थांनी केला आहे. या चारपाले गावामध्ये केवळ पाच टक्के लोकांना पैसे  अदा करण्यात आले आहेत. बाधित होणार्‍या सर्व जमिनी आणि लाभार्थी,  शेतकरी यांना शंभर टक्के पैसे वाटप झाल्याशिवाय रस्त्याच्या कामाला प्रारंभ  करू दिला जाणार नाही, असा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी या वेळी जाहीर  केला.

जनआंदोलनाची शक्यताया होणार्‍या दुसर्‍या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या बाधित होणार्‍या  जमीनमालकांपैकी फक्त पाच टक्के लोकांना मोबदला मिळाला असून ९५ टक्के  अद्याप शिल्लक आहेत. महसूल खात्यात आजही या ९५ टक्के बाधित  जमीनधारकांना फेर्‍या माराव्या लागत आहेत. यांच्या फाइल्स पूर्ण नाहीत,  असे सांगण्यात येत आहे. यामुळे बाधित प्रकल्पग्रस्त त्रस्त झाले आहेत.  यामुळे जनआंदोलनाची शक्यता आहे.

आम्ही चार पाले गावातील ग्रामस्थ एकजुटीने एकत्र आलो आहोत. चारही  गावांतील पैसे वाटपाची परिस्थिती सारखी आहे. लोक पैशासाठी दरदिवस  माणगावमध्ये फेर्‍या मारत आहेत. पैसे सर्वत्र वाटप होत नाही तोपर्यंत  कामाला सुरुवात करू देणार नाही.- दीपक मेस्त्री, सरपंच लाखापाले ग्रा. पं. 

शेतकर्‍यांचे कागदपत्र पूर्ण आहेत. शासन दरबारी कागदपत्रांमध्ये त्रुटी आहे त. त्या पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांना सरकारी अधिकार्‍यांकडून सहकार्य  मिळत नाही. पैसे अदा करण्यापूर्वी जोरजबरदस्ती करत महामार्गाचे काम सुरू  करण्याचा प्रयत्न केला तर महामार्गावर उतरू.- महमद अली लोखंडे, प्रकल्पग्रस्त

जमिनीचा एक रुपया मोबदला मिळालेला नाही. माणगाव प्रांत कार्यालयात  तीन महिने फेर्‍या मारत आहोत. पैसे दिल्यानंतर जागा ताब्यात देऊ. सध्या पैसे  मिळत नाहीत. आम्ही गरीब लोक घर सोडून जाणार कुठे. - अजीमुद्दीन मुरुडकर, प्रकल्पग्रस्त

ग्रामस्थांकडून करण्यात येणारे आरोप चुकीचे आहेत. दोन गाव मिळवून ३६  फाइल सबमिट आहेत. १४ फाइलला त्रुटी आहेत, तर आठ फाइल हरकतीवर  आहेत. गेल्या आठवड्यात पुन्हा ९ फाइल दाखल झाल्या आहेत. ५ फाइल  पूर्ण आहेत. त्याचे पैसे देण्यात येणार आहेत.- बाळासाहेब तिडके, प्रांताधिकारी माणगाव 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा