माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे ८०व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 12:58 IST2024-03-22T12:57:00+5:302024-03-22T12:58:28+5:30
पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईत घेतला अखेरचा श्वास

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे ८०व्या वर्षी निधन
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हसळा: राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस (८०) यांचे गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर म्हसळा तालुक्यातील आंबेत येथील मूळगावी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
नर्गिस अंतुले यांच्या अंत्यदर्शनासाठी आंबेत गावात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी खासदार सुनील तटकरे, शेकापचे आमदार जयंत पाटील, भाजपचे आमदार रवीशेठ पाटील, काँग्रेसचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, नाझीम हसवारे आदी उपस्थित होते.