अखेर बोया सापडला, पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 22:47 IST2025-07-11T22:46:55+5:302025-07-11T22:47:04+5:30

रायगडच्या कोर्लई समुद्र किनारी एका फिशिंग बोयाने सर्व यंत्रणांची झोप उडविली होती.

Finally the buoy was found, the police breathed a sigh of relief | अखेर बोया सापडला, पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला

अखेर बोया सापडला, पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला


अलिबाग - सहा दिवसांच्या प्रयत्नानंतर शुक्रवारी सायंकाळी ६.१४ मिनीटांनी कोर्लई समुद्रात बोया पोलिस सर्चींग आॅपरेशनमध्ये सापडला. हा बोया कोचगार्डकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम थांबविली असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांनी सांगितले.

रायगडच्या कोर्लई समुद्र किनारी एका फिशिंग बोयाने सर्व यंत्रणांची झोप उडविली होती. मागील सहा दिवसांपासून रायगडच्या रेवदंडा, अलिबाग, मुरूड, कोर्लई, मांडवा समुद्र किनाऱ्यावर पोलिस आणि इतर सागरी सुरक्षा यंत्रणा विविध यंत्रणांच्या आधारावर समुद्रातून वाहून आलेल्या फिशिंग बोयाचा अहोरात्र शोध घेत होते. याला आता पुर्णविराम मिळाला आहे.

रायगडच्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी मोठ्या शिताफीने बॉम्ब डिटेक्टर च्या सहाय्याने या हालचाली शोधण्याचे काम सुरू होत. शुक्रवारी सायंकाळी कोर्लई समुद्र किनाऱ्यावर अखेर हा बोया सापडला आहे. हा बोया सोलार पाॅवर असल्याने तो सुर्य किरणानांनी चार्ज होत असे, त्यामुळे सतत जागा बदल्याने सापडण्यात वेळ गेला आहे. पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी स्वता लक्ष दिल्याने फिशिंग बोया जलद सापडला आहे.

Web Title: Finally the buoy was found, the police breathed a sigh of relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस