शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यात अडचण नको - श्रीरंग बारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 10:57 IST

कर्जत तालुक्यातील कडाव, सुगवे, मानिवली आणि बिरदोले येथील शेतीवर जाऊन शेतपिकांची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी आज २२ ऑक्टोबर रोजी केली.

कर्जत :कर्जत तालुक्यातील १५०० हेक्टर जमिनीवरील भातपिकाचे नुकसान परतीच्या पावसाने केले आहे. नुकसानग्रस्त पिकाचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. धानमंत्री पीक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे त्या शेतकऱ्यांना विमा प्राप्त होण्यात काही अडचणी असल्यास त्यांनी आपल्याला थेट संपर्क साधावा, असे आवाहन कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

कर्जत तालुक्यातील कडाव, सुगवे, मानिवली आणि बिरदोले येथील शेतीवर जाऊन शेतपिकांची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी आज २२ ऑक्टोबर रोजी केली. कडाव येथे विलास बडेकर आणि पुंडलिक माळी, सुगवे येथील पेमारे यांच्या शेतात, बिरदोले गावातील शैलेश जामघरे, रवींद्र जाधव आणि अवधूत जामघरे यांच्या शेतातील बांधावर जाऊन पाण्याने भरलेल्या पिकाची पाहणी खासदार बारणे यांनी केली. या वेळी दौऱ्यात प्रशासनाच्या वतीने सहभागी झालेल्या लोकमत न्यूज नेटवर्क खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातपिकाचे सरसकट पंचनामे करावेत, अशी सूचना केली. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले जात आहेत. शेतकऱ्यांकडून बँक पासबुक, आधार कार्ड आणि विमा काढला असल्यास त्याचे पेपर घ्यावेत म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात मदत देण्याची कार्यवाही करणे सोपे जाईल, अशी सूचना तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांना केली. ज्या शेतकऱ्यांनी भातपिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विम्याची पावती द्यावी. त्यातूनदेखील विम्याचे संरक्षण मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी थेट आपल्याला फोन करून माहिती द्यावी, अशी सूचना केली आहे. 

या वेळी एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहे. खासदार बारणे यांच्यासह तालुका पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे, कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्यासह कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते.

नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी -दासगाव - यंदा परतीच्या पावसाने संपूर्ण कोकणाला झोडपून काढले. या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भातपीक शेतीमध्ये झोपून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर काही प्रमाणात उभ्या असलेल्या भातपिकाच्या शेतीमध्ये आजही मोठ्या प्रमाणात पाण्याचे तलाव तुंबले आहेत. अशा शेतकऱ्यांची शेतीदेखील धोक्यात आली आहे. इतर शेतीच्या पंचनाम्याबरोबर याही शेतकऱ्यांचे पंचनामे होणे गरजेचे आहे. मात्र अशा शेतकऱ्यांचे पंचनामे न करता त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. कृषी खात्याकडून घाईगडबडीने केले जाणारे पंचनामे थांबवून सर्व नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.महाड तालुक्यातदेखील पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. हातातोंडात आलेले पीक शेतात झोपून गेले तर काही आजही पाण्यात उभे आहे. मात्र शेतीमधून यंदा भातपिकाची आशा निघून गेली आहे. कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. हे पंचनामे फक्त झोपलेल्या शेतीचेच करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतामध्ये ढोपर ढोपर पाण्यात उभी असलेली शेती ही अडचणीतच आली आहे. कृषी खात्याकडून घाईगडबडीत दासगाव विभागात शेतीचे पंचनामे केले जात आहेत. त्यावर शेतकरी वर्गाकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. दासगाव परिसरात जवळपास १२० हेक्टर जमिनीवर भातशेती केली जाते. मोठ्या प्रमाणात शेतकरी भातशेतीवरच अवलंबून आहेत.  

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगडKarjatकर्जत