शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

३५ दिवसांत ११ कोटी ४९ लाखांचा निधी होणार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:55 AM

आपल्या मतदार संघात जनसामान्यांच्या विकासासाठी विकास योजना अमलात आणण्याकरिता प्रत्येक आमदारांना दरवर्षी दोन कोटी रुपयांचा निधी येत असतो.

जयंत धुळप अलिबाग : आपल्या मतदार संघात जनसामान्यांच्या विकासासाठी विकास योजना अमलात आणण्याकरिता प्रत्येक आमदारांना दरवर्षी दोन कोटी रुपयांचा निधी येत असतो. सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा आणि चार विधानपरिषद सदस्य, असे एकूण ११ आमदार असून, त्यांना प्राप्त एकूण २६ कोटी २६ लाख रु पये निधीपैकी अद्याप ११ कोटी ४९ लाख ्नॅपयांचा निधी शिल्लक असून, ३१ मार्चपूर्वी म्हणजे पुढील केवळ ३५ दिवसांत हा निधी खर्च करावा लागणार आहे. ३१ मार्चला निधी परत जाऊ नये, याकरिता प्राप्त निधीच्या अधिक खर्चाच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता घेऊन हा निधी वाचविण्याचा प्रयत्न आमदारांच्या माध्यमातून होत आहे.पनवेलचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांचा एक कोटी ३१ लाख रुपये, असा सर्वाधिक निधी शिल्लक आहे. श्रीवर्धनचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे यांनी त्यांना प्राप्त निधीतून ४६ विकासकामे केली असून, त्यांचा सर्वात कमी म्हणजे ७८ लाख ५० हजार रु पये निधी शिल्लक आहे. संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आर्थिक वर्षातील शिल्लक ३५ दिवसांत निधी खर्च करण्याच्या नियोजनातून जिल्ह्यात विविध विधानसभा मतदार संघात सध्या भूमिपूजन समारंभांची भाऊगर्दी दिसू लागली आहे. विधानपरिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या आमदारकीचा कार्यकाल मे महिन्यानंतर संपणार असल्यानेत्यांना नव्या आर्थिक वर्षातनिधी मिळणार नाही, अशी माहिती नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी दिली.प्रत्येक आमदारांना दरवर्षी स्थानिक विकास कार्यक्र मासाठी दोन कोटी रु पयांच्या निधी येत असतो. या निधीतील दहा टक्के निधी अनुसूचित जाती व जमातींच्या कल्याणकारी योजनांकरिता वापरणे अपेक्षितआहे. मात्र, अधिकाधिक निधी बांधकामावर खर्च होत असल्याचे दिसून येत आहे.आमदार स्थानिक विकास कार्यक्र म २०१७-१८मध्ये जिल्ह्यातील सात विधानसभा सदस्यांना एकूण १६ कोटी ९७ लाख ३१ हजार रुपये निधी उपलब्ध झाला. यापैकी एकूण २३५ विविध विकासकामांकरिता एकूण नऊ कोटी ६८ लाख निधी वितरीत झाला आणि सात कोटी २८ हजार रुपये आमदार निधी शिल्लक राहिलेला आहे. जिल्ह्यातील चार विधानपरिषद सदस्यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्र माकरिता नऊ कोटी २९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. यापैकी एकूण १७६ विविध विकासकामांकरिता सात कोटी सात लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आणि चार कोटी २१ लाख रुपये निधी अद्याप शिल्लक राहिला आहे.आमदार स्थानिक विकास कार्यक्र म (रु. लाखांत)आमदाराचे नाव प्राप्त निधी वितरीत निधी शिल्लक निधी मंजूर कामेप्रशांत ठाकूर (पनवेल) २९८.९९ १६७.४३ १३१.५६ २९सुरेश लाड (कर्जत) ३०६.८० १९२.४९ ११४.३१ ३७मनोहर भोईर (उरण) २५७.८९ १६४.२८ ९३.६१ २५धैर्यशील पाटील (पेण) २०७.२० ७६.१२ १३१.०८ २५सुभाष पाटील (अलिबाग) २०९.५२ ११९.३८ ९०.१४ ३९अवधूत तटकरे (श्रीवर्धन) २१६.९१ १३८.४१ ७८.५० ४६भरत गोगावले (महाड) २००.०० ११०.८८ ८९.१२ ३४अनिल तटकरे (राय, रत्ना, सिंधू) २२९.८८ १४४.४३ ८५.४५ ३६सुनील तटकरे (पूर्ण राज्य) २०२.०० ८२.९९ ११९.०९ २६जयंत पाटील (पूर्ण राज्य) २३०.१८ ८९.९१ १४०.२७ १७बाळाराम पाटील (कोकण विभाग) २३७.०० १९०.५० ७६.५० ९७एकूण २६२६.३७ १४७६.८२ ११४९.५५ ४११