शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतांचे गणित जुळवताना निवडणूक खर्चाचा लागत नाही हिशेब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:38 IST

रायगड लोकसभा निवडणुकीतील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड लोकसभा निवडणुकीतील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या कालावधीत आघाडी आणि युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बड्या-बड्या स्टार प्रचारकांच्या सभा पार पडल्या आहेत, तर काही ठिकाणी अद्यापही सभा होणार आहेत. आतापर्यंत विविध सभांवर तटकरे आणि गीते यांच्याकडून प्रत्येकी तीस लाख रुपयांचा खर्च केल्याचे बोलले जाते; परंतु खर्चाचे शॅडो रजिस्टर आणि उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाचा ताळमेळच लागत नसल्याने प्रशासनासह उमेदवारांचीही चांगलीच तारांबळ उडल्याचे दिसून येते. १५ एप्रिलपर्यंत झालेला खर्चाचा हिशेब १६ एप्रिल रोजी झालेल्या ताळमेळ बैठकीत देण्यात आलेला आहे. मात्र, त्यानंतरच्या हिशेबाचे गणित जुळत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली होती. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने निवडणूक विभागाने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे उमेदवाराच्या वारेमाप खर्चावरही नियंत्रण आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ७० लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. ७० लाख रुपयांच्यावर उमेदवारांना एक नवा पैसाही खर्च करता येणार नाही. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये तब्बल १६ उमेदवार आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते या दोन उमेदवारांमध्येच खरी लढत असल्याने दोन्ही उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. याच उमेदवारांभोवती निवडणूक फिरत असल्याने स्वाभाविकपणे सर्वांच्याच नजरा याच दोन उमेदवारांकडे लागल्या आहेत.या आधी २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गीते यांनी तटकरे यांचा अतिशय निसटता पराभव केला होता. हेच दोन्ही नेते आता पुन्हा शड्डू ठोकून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. गीते यांनी केलेला पराभव तटकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांना ही निवडणूक काही करून जिंकायचीच असल्याने त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे, तर दुसरीकडे गीते हे हॅट्ट्रिक करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनीही चांगलाच जोर लावला आहे.आघाडीला आणि युतीला आपापल्या उमेदवारांना निवडून आणायचेच असल्याने मतदारसंंघामध्ये विविध ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन केले आहे. त्यातील बहुतांश सभा या पार पडल्या आहेत.स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, धनंजय मुंडे, डॉ.अमोल कोल्हे, जयंत पाटील, नवाब मलिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे. यांच्या जंगी सभांना हजारोंच्या संख्येन गर्दी होत असल्याचे दिसून येते. भव्यदिव्य स्टेज, लाइट, खुर्च्या, ध्वनिक्षेपक, वाहने, झेंडे, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, नाष्टाची व्यवस्था, पत्रक, बॅनर यासह अन्य बाबींवर खर्च होत आहे. निवडणूक विभागाने आखून दिलेली ७० लाखांची मर्यादा ओलांडली जाते का यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी पथक तैनात केली आहेत. सभेच्या ठिकाणी उभारलेले स्टेज, खुर्च्या, पाणी, सभेला झालेली गर्दी अशा सर्वांचे चित्रीकरण केले जात आहे.उमेदवाराला आपल्या खर्चाचा हिशेब डे टू डे अपडेट ठेवावा लागत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सादर केलेला खर्च आणि प्रशासनाकडे असलेले शॅडो रजिस्टर यांचा ताळमेळ बसणे गरजेचे आहे. तटकरे आणि गीते यांनी आतापर्यंत प्रत्येकी ३० लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागातील मीडिया सेंटरने ‘लोकमत’ला दिली. परंतु उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याने निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर त्याची माहिती अपलोड करण्यात आली नसल्याची माहितीही त्यांनी दिली.>गुहागर, दापोली मतदारसंघातीलखर्च वेळेवर मिळण्यास अडचणीउमेदवार सतत प्रचारामध्ये व्यस्त असतात. त्यांनी खर्चासाठी टीम नेमलेली असते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे खर्चाच्या पावत्या सादर करण्यास विलंब होतो. त्याचप्रमाणे रायगड लोकसभा मतदार संघाचा काही भाग रत्नागिरी जिल्ह्याला जोडला आहे. तेथील गुहागर आणि दापोली मतदार संघात झालेला खर्चही वेळेवर मिळण्यास अडचणी येत असाव्यात. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ लागण्यास उशीर होतो. त्या सर्व पावत्या सादर केल्यावर हिशेबाची गणिते जुळतात, असे एका राजकीय नेत्याने सांगितले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड